नांदेड : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेच्या ठोक्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची धावपळ सुरु होती़ तीन वाजेपर्यंत उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात धावत -पळत येत होते़ त्यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले़लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीत ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते़ तर ५५ जण रिंगणात होते़ त्यामध्ये उमेदवारी मागे घेण्याच्या पहिल्या दिवशी गुरुवारी दहा जणांनी माघार घेतली होती़तर शुक्रवारी शेवटच्या दिवशी नेमके किती उमेदवार माघार घेतील याची उत्सुकता होती़ उमेदवारांची मने वळविण्यासाठी पडद्यामागून बऱ्याच हालचाली झाल्या़ दुपारी अडीच वाजेपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी जमली होती़ माघारीसाठी आलेला प्रत्येकजण घाईगडबडीत असल्याचे दिसून आले़ दुपारी दोन वाजून ५५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या काही अपक्ष उमेदवारांनी तर धावत-पळतच जिल्हाधिकारी यांचा कक्ष गाठला़ उमेदवारांची माघारीसाठीची ही धावपळ पाहून उपस्थितांचे मात्र मनोरंजन होत होते़ उमेदवारांची धावपळ शेवटपर्यंत सुरूच होती़
माघारीसाठी उमेदवारांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 00:21 IST
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन वाजेच्या ठोक्यापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची धावपळ सुरु होती़ तीन वाजेपर्यंत उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयात धावत -पळत येत होते़ त्यामुळे उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले़
माघारीसाठी उमेदवारांची धावपळ
ठळक मुद्देमनोरंजन : अपक्ष उमेदवाराने तर पळतपळत कक्ष गाठला