रुक्मिणीबाई घागरदरे (निधन वार्ता)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:17 IST2021-04-02T04:17:49+5:302021-04-02T04:17:49+5:30
केशवराव मारुडवार नांदेड : हिमायतनगर येथील रहिवासी केशवराव सदाशिवराव मारुडवार यांचे हृदयविकारावर उपचार चालू असताना पुसद येथील एका दवाखान्यगात ...

रुक्मिणीबाई घागरदरे (निधन वार्ता)
केशवराव मारुडवार
नांदेड : हिमायतनगर येथील रहिवासी केशवराव सदाशिवराव मारुडवार यांचे हृदयविकारावर उपचार चालू असताना पुसद येथील एका दवाखान्यगात मंगळवार ३० मार्च रोजी निधन झाले. त्यांच्यावर ३१ रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील व संजय मारुडवार यांचे ते वडील होत.
बालाजी मेकाले
नांदेड : तरोडा खु. येथील प्रसिद्ध गायकवा बालाजीराव मारोती मेकाले (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवार ३० मार्च रोजी उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट येथे मंगळवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
बालासाहेब पाटील मेथे
नांदेड : लोहा तालुक्यातील कापसी गुंफा येथील ज्येष्ठ नागरिक बालासाहेब भुजंगराव पाटील (वय ६७) यांचे मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धनघाट नांदेड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातू, पणतू असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राचार्य गोविंदराव मेथे यांचे ते चुलते होत.
फोटोसह
रोहिणीबाई मारोती गुम्मलवार यांचे निधन
नांदेड : विणकर कॉलनी नांदेड येथील रोहिणीबाई मारोती गुम्मलवार यांचे १ एप्रिल रोजी सकाळी निधन झाले आहे. अंत्यविधी गोवर्धनघाट येथे झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातू, नातवंडे असा परिवार आहे. धनंजय गुम्मलवार, संतोष गुम्मलवार, विनोद गुम्मलवार यांच्या त्या मातोश्री होत.