नियोजन समितीत सदस्य निलंबनाच्या विषयावर काँग्रेस- सेनेची समन्वयाची भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 14:05 IST2019-01-16T14:04:06+5:302019-01-16T14:05:45+5:30
काँग्रेसच्या चार सदस्यांना पालकमंत्री कदम यांनी मागील बैठकीत निलंबित केले होते.

नियोजन समितीत सदस्य निलंबनाच्या विषयावर काँग्रेस- सेनेची समन्वयाची भूमिका
नांदेड- जिल्हा नियोजन समितीतील गोंधळी चार सदस्यांच्या निलंबनाच्या विषयावर काँग्रेस अन सेनेने समन्वयाची भूमिका घेतली. त्यानंतर पालकमंत्री रामदास कदम यांनी निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले.
जिल्हा नियोजन समितीत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या चार सदस्यांना पालकमंत्री कदम यांनी मागील बैठकीत निलंबित केले होते. त्यानंतर निलंबित चार सदस्यांनी निलंबनाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात या विषयावर बुधवारी सुनावणी होती, न्यायालयाकडून या सदस्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे या विषयावर आजच्या नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ होण्याची शक्यता होती.
परंतु पालकमंत्री कदम यांनी निलंबन मागे घ्यावे, सदस्य याचिका परत घेतील असा प्रस्ताव खा. अशोकराव चव्हाण यांनी ठेवला होता. त्याला पालकमंत्री कदम यांनी संमती दर्शवत निलंबन मागे घेण्याचे आदेश दिले.त्यामुळे निलंबनाच्या विषयावर सेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी दोन पावले मागे घेतली आहेत