नांदेडमध्ये सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांची गोळी झाडून आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 11:28 IST2022-07-04T11:28:33+5:302022-07-04T11:28:52+5:30
मल्लिकार्जुन स्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वी पुणे येथे दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.

नांदेडमध्ये सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांची गोळी झाडून आत्महत्या
नांदेड- महापालिका स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांचे वडील अन सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक मल्लिकार्जुन स्वामी यांनी रविवारी रात्री घरातील बाथरूम मध्ये स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. मयत स्वामी यांना अनेक वर्षांपासून श्वसनाचा त्रास होत होता.या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.
मल्लिकार्जुन स्वामी यांच्यावर काही दिवसांपूर्वी पुणे येथे दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शहरातील शारदा नगर येथे राहत होते. त्रास असह्य होत असल्याने रविवारी सुसाईड नोट लिहून त्यांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. स्वामी यांच्यावर त्यांचे मूळ गाव असलेल्या आखाडा बाळापूर येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.