शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आरक्षण आंदोलनाला नांदेड जिल्ह्यात धनगर समाजाचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 00:33 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाभरात अनेक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ तर दुसरीकडे तहसिल कार्यालयावर मेंढ्या घेवून मोर्चे काढण्यात आले़ जिल्हाभरात सोमवारी धनगर समाजाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता़

ठळक मुद्देमहामार्गावर रास्ता रोकोमुळे अनेक तास वाहतुक खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाभरात अनेक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ तर दुसरीकडे तहसिल कार्यालयावर मेंढ्या घेवून मोर्चे काढण्यात आले़ जिल्हाभरात सोमवारी धनगर समाजाच्या वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले़ यावेळी मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता़धनगर समाजाला अनुसुचित जाती प्रवर्गात समाविष्ठ करुन आरक्षण देण्यात यासह विविध मागण्यासाठी सोमवारी नांदेड शहरातून दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या देत कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या़धनगर समाज हा संविधानामध्ये अनुसुचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर असून त्याप्रमाणे शासनाने अंमलबजावणी करावी़ धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ठ करावे, गायरान जमिनी खुल्या करण्यात याव्यात यासह विविध मागण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सकल धनगर समाज शहरातून दुचाकी रॅली काढून शासनाचा निषेध नोंदविला़ त्याचबरोबर युवा मल्हार सेना व धनगर समाजाच्यावतीने धनगरवाडी पाटी जवळ रास्तारोको करण्यात आला़ यावेळी काही कार्यकर्त्यांना अटक करून त्यांची सोडून देण्यात आले़नांदेड शहरालगत असलेल्या पासदगाव येथून दुचाकी रॅली काढण्यात आली़ शेकडो युवकांनी या रॅलीत सहभाग नोंदविला़ येळकोट येळकोट जय मल्हार, आरक्षण आमच्या हक्काचे यासह विविध घोषणा युवकांनी दिल्या़ त्याचबरोबर शासनाच्याविरोधात घोषणा देत दुचाकी रॅली तरोडा नाका, आयटीआय, शिवाजीनगर, वजिराबाद चौक ते विष्णुपुरी दरम्यान काढण्यात आली़ विष्णुपुरी येथील अहिल्यादेवी होळकर चौक येथे अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यात आले़---

  • गुलाब देवून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सोमवारी रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला होता़ त्यामुळे अनेक ठिकाणी व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाणे बंद ठेवली होती़ दरम्यान, लोहा येथे तहसिल कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी व्यापाºयांना गुलाब देवून आपली दुकाने उघडण्याचे आवाहन केले़ तसेच आंदोलनकर्त्यांकडून दुकानावर दगडफेक किंवा नुकसान न करण्याचे आश्वासनही देण्यात आले़ यावेळी आंदोलनकर्त्यांनी बंदोबस्तावरील पोलिस कर्मचारी, बसेसचे चालक, वाहक यांना गुलाब देवून त्यांचेही आभार मानण्यात आले़----

  • दोन तास हैद्राबाद महामार्ग बंद

बिलोली :: धनगर समाजाच्या आंदोलनाला बिलोलीत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आंदोलनात परिसरातील कार्यकर्ते सहभागी झाल्याने नांदेड हैदराबाद महामार्ग दोन तास बंद झाला. दोन्ही दिशेला वाहनांची दोन किलोमीटर रांग लागली होती. विविध मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी तहसीलामोर ठाण मांडले. सोमवारी सकाळी ११ वाजता विविध भागातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. पिवळे वस्त्र परिधान करून आंदोलनकर्त्यांनी लक्ष वेधले. घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला. सीमावर्ती भागात धनगर समाजाची मोठी संख्या असल्यामुळे मोर्चाला उदंड प्रतिसाद मिळाला. मोर्चामध्ये अनेकांनी आरक्षण संबंधीत विचार मांडले. मोर्चाला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिल्याचे अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष शेख सुलेमान यांनी भाषणातून सांगितले. रास्ता रोको व मोर्चा शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा मोर्चेकºयांनी केला आहे़ मोर्चात सरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पेंते, रमेश शिरगिरे, शंकर परसुरे, साईनाथ बोडके, गोविंद पेटकर, संग्राम पेंते, लक्ष्मण होरके, शिवकांत मैलारे, श्याम माजगे, गजानन चिंतले आदींसह दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले. बिलोली पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महामार्ग बंद झाल्याने दोन तास नागरिकांची तारांबळ उडाली़---

  • शहरातून काढण्यात आलेली दुचाकी रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर या ठिकाणी ठिय्या देवून जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले़ यावेळी सखाराम तुपेकर, व्यंकट मोकले, सुरेश तुपेकर, सुरेश चितले, दिपक तोडमे, नवनाथ काकडे, पंढरीनाथ जायनुरे, राजेश तुतारे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस वैभव खांडेकर, गजानन बेळगे, वैभव पांढरे यांच्यासह शेकडो धनगर समाज बांधव उपस्थित होते़
  • लातुर महामार्गावरील मुसलमानवाडी पाटी येथे धनगर समाजबांधवाच्यावतीने रास्ता रोको केला़ यावेळी बळीरामपुरचे जि़प़ सदस्य गंगाप्रसाद काकडे, शिवाजी होळकर, टोपाजी काकडे, पंढरी जायनोरे, खंडोजी अकोले, गोविंद वाघमारे, संतोष बीरसे, नवनाथ काकडे, सोनु काकडे यांचा सहभाग होता़
  • नायगांव येथे नांदेड-हैदराबाद या महामार्गावरील हेडगेवार चौकात मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. शहरातून रॅली काढण्यात आली. व्यापाºयांनी बाजारपेठही बंदच ठेवली़ आंदोलनकर्त्यांनी निवेदन नायब तहसीलदार एऩबी़ वगवाड यांना दिले़ यावेळी बालाजी चोंडे, माणिक लोहगावे, सूर्याजी पा़ चाडकर, शिवाजी पा़ होटकर, गंगाधर नारे आदी उपस्थित होते़
  • अर्धापूर येथे तहसील वर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मारोतराव कानोडे, चंपतराव बारसे, तुकाराम साखरे, पुरभाजी कानोडे, शिवप्रसाद दाळपुसे,सह समाजातील लहान थोर पुरुष सामील झाले होते. यावेळी तहसीलदार डॉ.अरविंद नरसीकर यांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि त्र्यंबक गायकवाड, दिगंबर जामोदकर व पोलीस कर्मचा-यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
टॅग्स :Nandedनांदेडreservationआरक्षणagitationआंदोलन