रेणुकादेवी घाटात भाविकांचे वाहन कठड्यास धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:29 IST2019-03-07T00:28:25+5:302019-03-07T00:29:23+5:30
दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली.

रेणुकादेवी घाटात भाविकांचे वाहन कठड्यास धडकले
श्रीक्षेत्र माहूर : दर्शन घेवून परत जाताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटातील दुसऱ्या वळणावर वाहनाचा अपघात झाला. अपघातात दोन भाविक गंभीर जखमी तर १७ भाविकांना किरकोळ जखमा झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घडली.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातल्या कोर्टा येथील भाविक दर महिन्याला माहूरगडावरील देवस्थानावर दर्शन घेण्यासाठी येत असतात़ नेहमीप्रमाणे ६ मार्च रोजी सकाळी क्रूझर या खाजगी वाहनाने (क्र. एम़ एच. २२ डी़२१९८) १२ वाजताच्या सुमारास माहूरगडावरील सर्व देवस्थानचे दर्शन घेऊन पांडवलेणी येथे दर्शनासाठी जात असताना रेणुकादेवी मंदिराच्या पायथ्याशी घाटात दुसऱ्या घातक वळणावर क्रूझर गाडी गेली. येथे चालक-मालक संदीप बर्गे (वय २२ रा़ एकंबा, ता़उमरखेड) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन संरक्षक भिंतीवर जाऊन धडकले़ यात सखाराम तेलेवाड (६५), धोंडिबा कºहाळे (६५), विलास बुरकुले (४०), तुकाराम देवताळे (४०), ममता मेंडके (३०), शेषाबाई शेळके (६०), दगडाबाई शेळके (६०), पुण्यरथा खराटे (३५), सुरेखा खराटे (२०), रामराव खराटे (२०), पायल खुडे (८), कुसुम बुरकुले (६०), वत्सलाबाई खंदारे (६०), अनूसया डोकाळे (५५), राहुल खंदारे (१२), कार्तिक शेळके (८), गौरव बुरकुले (५) हे गंभीर जखमी झाले आहेत़
घटना कळताच रेणुकादेवी संस्थानच्या रूग्णवाहिकाचे चालक विनोद जाधव, सुरक्षारक्षक इंद्रजिीत राठोड, गजानन घुगे यांच्यासह कर्मचारी व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जमखींना माहूर येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे डॉ़व्ही़एऩभोसले, डॉ़विजय मोरे, डॉ़ प्रसन्न भबुतकर, डॉ़निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार करून दोन गंभीर जखमीस पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले़