‘एमआयएम’ ला धक्का; नांदेड शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 00:32 IST2018-12-18T00:31:19+5:302018-12-18T00:32:12+5:30
एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़

‘एमआयएम’ ला धक्का; नांदेड शहराध्यक्ष काँग्रेसमध्ये
नांदेड : एमआयएममध्ये अनेक वर्षांपासून शहराध्यक्षपद सांभाळणाऱ्या महंमद मुखीद यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करीत माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला़ मुखीद यांना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी दक्षिण नांदेडातील अनेक दिग्गजांनी फिल्डिंग लावली होती़ मुखीद यांच्या प्रवेशामुळे या भागात काँग्रेसची ताकद आणखी वाढणार असून विधानसभेतही त्याचा फायदा होवू शकतो़
सय्यद मोईन हे जिल्हाध्यक्ष असतानापासून महमंद मुखीद हे एमआयएमच्या शहराध्यक्षपदी होते़ त्यानंतर एमआयएमच्या जिल्हाध्यक्षपदी फेरोज लाला यांची निवड करण्यात आली होती़ परंतु सुरुवातीपासूनच लाला आणि मुखीद यांच्यात खटके उडत होते़ त्यामुळे लाला यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षनेतृत्वाला मुखीद यांच्याकडील शहराध्यक्षपद काढून घेण्यात यावे असे पत्र पाठविले होते़ पक्षनेतृत्वानेही लाला यांच्या पत्रावरुन मुखीद यांच्याकडील पद काढून घेतले़ त्यामुळे नाराज झालेल्या मुखीद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला़
लाला डावपेचात कमी पडतात- मुखीद
फेरोज लाला यांना राजकारणातील डावपेच माहीत नाहीत़ तुम्ही जिल्ह्याचं काम करा मी शहराचे करतो असे मी त्यांना म्हणालो होतो़ परंतु, त्यांनी काहीएक ऐकून न घेता थेट पक्षनेतृत्वाला पत्र पाठवून माझे पद काढले, असे मुखीद म्हणाले़