सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याचा वादा; ४ लाख रुपये घेतले अन पुन्हा परतलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 17:19 IST2022-02-03T17:18:27+5:302022-02-03T17:19:53+5:30

धानोरा घाटाच्या मुख्य रस्त्यावर बोलावून घेतले पैसे

Promise to give gold coins cheaply; He took Rs 4 lakh and never returned | सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याचा वादा; ४ लाख रुपये घेतले अन पुन्हा परतलेच नाही

सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याचा वादा; ४ लाख रुपये घेतले अन पुन्हा परतलेच नाही

नांदेड : सोन्याचे नाणे स्वस्तात देण्याची आमिष दाखवून ४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार धानोरा घाट ता.किनवट (जि. नांदेड) येथे घडला आहे.

दिनेश दत्ता राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चार अनोळखी लोकांनी सोन्याचे नाणे स्वस्तात देतो म्हणून त्यांना आमिष दाखविले आणि त्यासाठी ४ लाख रुपये घेवून या म्हणून धानोरा घाटाच्या मुख्य रस्त्यावर बोलवले. तेथे आलेल्या अनोळखी लोकांनी ४ लाख रुपये घेतल्यावर सोने घेवून येतो असे सांगून गेले. पण परत आलेच नाहीत आणि ४ लाख रुपये लंपास केले. याप्रकरणी किनवट पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक एम.बी.राठोड हे करीत आहेत.

Web Title: Promise to give gold coins cheaply; He took Rs 4 lakh and never returned