शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा ३ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणार सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 12:06 AM

महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित महाराष्टÑ राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते २३ फेब्रुवारीदरम्यान कुसुम सभागृहात दुपारी ४ वाजता तर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रात्री ८ वाजता पार पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित महाराष्टÑ राज्य मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी ३ ते २३ फेब्रुवारीदरम्यान कुसुम सभागृहात दुपारी ४ वाजता तर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रात्री ८ वाजता पार पडणार आहे.५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नांदेडसह १९ केंद्रांवर पार पडली. त्यातून अंतिम फेरीसाठी नाटके निवडण्यात आली. साधारणत: अंतिम फेरीतील नाटकांचे सादरीकरण मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी होते. मात्र यावर्षी ही संधी नांदेडवासियांना उपलब्ध झाली आहे. एका दिवशी दोन सभागृहांत नाटकांचे सादरीकरण होणार असले तरी वेळेत अंतर असल्यामुळे रसिकांना या नाटकांचा आस्वाद घेता येणार आहे. अंतिम स्पर्धेसाठी एकूण ३७ नाटकांची निवड झाली आहे.कुसुम सभागृह येथे दुपारी चार वाजता सादर होणारी नाटके अशी- ३ फेब्रुवारी ‘बाजीराव नसतानी’ (औरंगाबाद), ४ फेब्रुवारी ‘इथर’ (सोलापूर), ५ फेब्रुवारी ‘आणि शेवटी प्रार्थना’ (नागपूर), ६ फेब्रुवारी ‘नथींग टू से’ (कोल्हापूर), ७ फेब्रुवारी ‘भिजलेल्या गोष्टी’ (डोंबिवली), ८ फेब्रुवारी ‘अनिमा’ (सोलापूर), ९ फेब्रुवारी ‘सुई धागा’ (मुंबई), १२ फेब्रुवारी ‘नांगर’ (सांगली), १३ फेब्रुवारी ‘निखारे’ (सिंधुदुर्ग), १४ फेब्रुवारी ‘द गिफ्ट’ (पुणे), १५ फेब्रुवारी ‘अखंड’ (औरंगाबाद), १६ फेब्रुवारी ‘पुस्तकाच्या पानातून’ (परभणी), १७ फेब्रुवारी ‘भेटी लागी जीवा’ (मुंबई), १८ फेब्रुवारी ‘कॅप्टन कॅप्टन’ (रत्नागिरी), १९ फेब्रुवारी ‘ मून विदाऊट स्काय’ (नाशिक), २० फेब्रुवारी ‘कु. सौ. कांबळे’ (अमरावती), २१ फेब्रुवारी ‘एलगोरीया दी लेडी ओर दी टायगर’ (दादर मुंबई), २२ फेब्रुवारी गोवा केंद्रावरील नाटक सादर होणार आहे. कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रात्री आठ वाजता सादर होणारे नाटके अशी-३ फेब्रुवारी ‘रक्षन्ति रक्षित’ (नागपूर), ४ फेब्रुवारी ‘आदिम’, ५ फेब्रुवारी ‘दर इंटरव्ह्यू’ (नवी मुंबई), ६ फेब्रुवारी ‘समीकरण’ (पुणे), ७ फेब्रुवारी ‘भाव अ पूर्ण श्रद्धांजली’ (मंबई), ८ फेब्रुवारी ‘सत्यदास’ (इंदोर), ९ फेब्रुवारी ‘कुलकर्णी आणि कंपनी’ (मुंबई), १० फेब्रुवारी ‘अम्मी’ (मुंबई), १२ फेब्रुवारी ‘पार्सल’ (सांगली), १३ फेब्रुवारी ‘द फोर्थ वे’ (जळगाव), १४ फेब्रुवारी ‘दर्द ए डिस्को’ (कोल्हापूर), १५ फेब्रुवारी ‘मृत्यूकडून जीवनाकडे’ (नांदेड), १६ फेब्रुवारी ‘मर्डरवाले कुलकर्णी’ (अहमदनगर), १७ फेब्रुवारी ‘सल’ (नवी मुंबई), १९ फेब्रुवारी ‘वाडा चिरेबंदी’ (यवतमाळ), २० फेब्रुवारी ‘उत्तरदायित्व’ (नाशिक), २१ फेब्रुवारी ‘दोजख’ (कल्याण), २२ फेब्रुवारी ‘आकार’ (पुणे) या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.नाटकांचा रसिकांनी आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने केले आहे.