शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाची हजेरी

By admin | Updated: March 2, 2015 13:35 IST

वादळीवार्‍यासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने शनिवारी रात्री हजेरी लावली. रविवारीही पावसाची रिमझिम दिवसभर सुरू होती. या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

नांदेड : वादळीवार्‍यासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने शनिवारी रात्री हजेरी लावली. रविवारीही पावसाची रिमझिम दिवसभर सुरू होती. या पावसामुळे शेतातील गहू, हरभरा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. 

उमरीत पिकांचे नुकसानउमरी : तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शनिवारी दुपारपासून वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण व वारा सुरू झाला. रात्री ८ वाजता पावसाला सुरुवात झाली. रात्री बराच वेळ पाऊस झाला. सकाळी काही वेळ रिमझिम पाऊस चालूच होता. या पावसाने वातावरणात मात्र गारठा सुरू झाला. सध्या रबी ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांची काढणी चालू आहे. कुठे ही पिके अजून शेतात उभी आहेत. अशातच पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. या पावसाने ज्वारी काळी पडेल व पाऊस पुन्हा चालूच राहिला तर ज्वारी, हरभर्‍याला मोड फुटतील. गहू सध्या जोमात असला तरी पावसाने गव्हाचे पीक काळे पडणार आहे. किनवटमध्ये गहू भुईसपाटकिनवट : तालुक्यात २८ फेब्रुवारीच्या रात्री सर्वदूर अवकाळी पावसाने जोराची हजेरी लावल्याने रबी हंगामातील गहू, हरभरा व अन्य पिके हातातोंडाशी आली असतानाच निसर्गाचा प्रकोप शेतकर्‍यांच्या पथ्थ्यावर पडल्याने रबी हंगामावर गंडांतर येण्याची भीती व्यक्त होत आहे. तालुक्यात सरासरी २९.७१ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस किनवट मंडळात ४८ मि. मी. इतका झाला आहे.तालुक्यात २८ फेब्रुवारी रोजी दुपारी अचानक ढगाळ वातावरण होवून रिमझिम सरी बरसल्या. त्यानंतर मात्र रात्री अवकाळी पावसाने मेघगर्जनेसह व वार्‍यासह तालुक्यालाच झोडपून काढले. या वारा पावसाने गहू आडवा पडला. हरभरा, रबी ज्वारी, मका व अन्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. खरिपातील शेवटी शेवटी वेचणीसाठी असलेला कापूसही भिजून खराब झाला. आंब्याचा मोहोरही गळाला. यात आंब्याचे मोठे नुकसान झाले.तालुक्यात मंडळनिहाय अवकाळी पाऊस याप्रमाणे - किनवट ४८ मि.मी., बोधडी ३0 मि.मी., जलधरा २५ मि.मी., इस्लापूर ३0 मि.मी., शिवणी २0 मि.मी., मांडवी २५ मिमी., दहेली ३0 मि.मी. या पावसाने उन्हात गारवा निर्माण झाला आहे. अस्मानी संकटाने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. याबाबत तहसीलदार शिवाजी राठोड यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यात कोठेही गारपीट झाली नाही. मात्र अवकाळी पाऊस सर्वत्र असल्याचे त्यांनी सांगितले. 

धर्माबादेत पावसाची हजेरीधर्माबाद : तालुक्यात शनिवारी रात्रभर अवकाळी पाऊस पडल्याने रबी हंगामातील पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आणखी चिंतेत पडला आहे.ऐन रबीच्या मोसमात सतत तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस तालुक्यात पडत असल्याने टाळकी ज्वारी काळी पडत आहे. हरभरा, गहू, आडवा पडला असून फळबागा, मोसंबी, टरबूज आणि पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. धनिया पीक काढायला आलेले पावसामुळे नुकसान झाले. मिरची, टमाटे, वांगी आदी पालेभाज्यांवर ढगाळ वातावरणामुळे माव, अळ्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंब्याचा मोहोर गळून गेला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. काही भागात वादळीवारे सुटल्याने झाडे उन्मळून पडली आहेत. ढगाळ वातावरण आरोग्यास घातक ठरून असून गारवा सुटला आहे. 

बारडमध्ये पिकांचे नुकसानबारड : बारड परिसरात काल रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा, आंबा पिकाचे अतोनात नुकसान झाले. शेतकर्‍यांच्या हाती येणारे गहू, हरभरा पिके काढणीलायक झाली असल्याने हातातील घास जात असल्याची प्रतिक्रिया शेतकर्‍यांनी व्यक्त केली. ढगाळ वातावरणाने केळी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने पिवळी होत आहेत. काही ठिकाणी गहू आडवा पडला असून गारठय़ाच्या प्रमाणात वाढ झाली. बाकी पिकांवर या वातावरणामुळे रोगाचे प्रमाण वाढले असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. 

गडग्यात पावसाची रिपरिपगडगा : आधीच दुष्काळाने त्रस्त असलेल्या शेतकर्‍यास अवकाळी पावसाने झोडपले. २८ फेब्रुवारीच्या रात्री तसेच १ मार्च रोजी गडगा परिसरात मेघगर्जनेसह अधूनमधून पावसाची रिपरिप चालूच होती. परिणामी काढणीस आलेला तूर पीक मातीमोल झाले. शिवाय आंबा फळाचा मो/ हिमायतनगर : तालुक्यात १ मार्च रोजी सकाळी ७ पासून रिमझिम पाऊस सुरू होता. ११ वाजल्यानंतर २ पर्यंत जोरदार पाऊस होवून रबी पिकांचे नुकसान झाले. जमिनीतून पाणी वाहून निघाले. शेतकर्‍यांचा हरभरा, गहू आडवा झाला. तर काढलेले हरभरा ढीग पावसाने भिजले. गहू काढून पेंढय़ा रानाने असल्याने भिजले. यात गव्हाची चमक गेल्याने भाव कमी लागतो. हरभराही काळा पडतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे. खरीप पावसाअभावी गेला. दुष्काळाशी सामना करावा लागत असताना अल्प पावसामुळे रबीही केवळ १९00 हेक्टरवर आहे. 

पावसाचा परिणाम आठवडी बाजारावर

> दिवसभरापासून अवकाभ पावसाची रिपरिप सुरूच असल्याने या पावसाचा परिणाम किनवट येथील आठवडी बाजारावर झाला. > एवढेच नाही तर दोन दिवसांच्या पावसाने किनवट तालुक्यातील वीटभट्टी व्यवसायावर परिणाम झाला असून वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले. 

> शेकडो हात सध्या रिकामेच आहेत. तालुक्यात शंभराहून अधिक वीटभट्टी व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले. गहू भुईसपाट : किनवट तालुक्यात अवकाळी पावसाने गहू पीक असे भुईसपाट झाले. ती. शेतकर्‍यांची शेती निसर्गावर अवलंबून आहे. अवेळी पाऊस पडल्याने कडबा, गवत, चारा भिजला. शहरात यात्रेतही दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले. १ मार्च रोजी शेवटची स्पर्धा कबड्डी होती. या पावसामुळे ती आता ८ मार्च रोजी ठेवण्याचा निर्णय क्रीडा समितीने घेतला. २ मार्च रोजी कुस्त्या आहेत. रात्री पाऊस झाला तर उद्याच्या कुस्त्याही कदाचित पुढे ढकलाव्या लागतील.