शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

प्राणायाम, योगसाधनेची रंगीत तालीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:37 IST

योगऋषी स्वामी रामदेवबाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरीय कार्यक्रमास रामदेवबाबांची प्रमुख उपस्थिती

नांदेड : योगऋषी स्वामी रामदेवबाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने शिवरत्न जिवाजी महाले चौक (मामा चौक), असर्जन येथील मैदानावर १८ जून रोजी पहाटे ५ वाजता योग साधनेची रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी विविध शाळेचे विद्यार्थी, शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी प्राणायाम व योगसाधनेचा सराव केला.याप्रसंगी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, पतंजली योगपीठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. जयदीप आर्य, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, लेखाधिकारी निलकंठ पाचंगे, राजेश पवार, जि. प. सदस्या पूनम पवार, मिलिंद देशमुख, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर आदींची उपस्थिती होती. यावेळी सामान्य योग, शिथिलीकरण आसन, उभे राहून करण्यात येणारे ताडासन, पादहस्तानसन, अद्धचक्रासन, त्रिकोणासन तर बसून करण्यात येणाऱ्या आसनामध्ये दण्डासन, भद्रासन, वीरासन, उद्ध अष्ट्रासन, शशकासन, उत्तानमंडूकासन, वक्रासन, उत्तनमंडूकासन, पोटावर झोपून करावयाचे आसनामध्ये मकरासन, भुजंगासन, शलभासन तसेच पाठीवर झोपून करण्यात येणाºया आसनामध्ये सेतूबंध आसन, अत्तानपाद आसन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, श्वासन, योग निद्रा त्याचप्रमाणे प्राणायामामध्ये कपालभारती, अनुलोमविलोम, शीतली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व ध्यान अशा सात प्रकारांतील विविध आसने व प्राणायामाचे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी विविध कार्यालयांचे खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, शिक्षक, पतंजली योग समितीचे सदस्य, पत्रकार, महिला व पुरुष यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. गुरुवार, २० जून रोजी पहाटे साडेचार वाजता पुन्हा एकदा रंगीत तालीम याच मैदानावर घेण्यात येणार आहे.सुस्थितीत कार्यक्रम पार पाडावा- खा. चिखलीकरयोगऋषी स्वामी रामदेव बाबा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ जून रोजी नांदेडमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यस्तरीय योग शिबीर घेण्यात येत आहे. हा कार्यक्रम सुस्थितीत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले. आज शिवरत्न जिवाजी महाले मैदान असर्जन येथे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत योग दिनानिमित्त घेण्यात येणाºया शिबिर पूर्वतयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्त लहुराज माळी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जि.प. सदस्य तथा माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर, चैतन्यबापू देशमुख, मिलिंद देशमुख, मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कोंडेकर, यू.डी. इंगोले, एस.व्ही. शिंगणे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, कुंडगीर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.पी. कदम यांच्यासह विविध विभागांचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. २१ जून रोजी अधिकारी, कर्मचारी, शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, गावकरी, महिला बचत गटातील सदस्य, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, शिक्षक तसेच महिला व पुरुषांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

टॅग्स :NandedनांदेडYogaयोगBaba Ramdevरामदेव बाबा