शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
2
Manoj Pande Extension : लष्करप्रमुख मनोज पांडे यांना एक महिन्याची मुदतवाढ!
3
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
4
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
5
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
7
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
8
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
9
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
10
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
11
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
12
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
13
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
14
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
15
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
16
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
17
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
18
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
19
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
20
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 

नांदेड जिल्ह्यातील ग्रंथालयांची दयनीय अवस्था, भरघोस अनुदान असताना सुविधांची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:28 PM

नांदेड जिल्ह्यातील ७५८ पैकी ३८ ग्रंथालय पडली बंद

- अविनाश पाईकराव नांदेड : जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक ग्रंथालयांना घरघर लागली असून, अनेक ग्रंथालयाची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाचे भरघोस  अनुदान असतानाही सोयी-सुविधांची पूर्तता काही ग्रंथालयाकडून केली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे केवळ अनुदान लाटणाऱ्या ग्रंथालयांचे शासकीय अनुदान बंद का केले जाऊ नये? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात ७५८ शासकीय अनुदान घेणाऱ्या ग्रंथालयांची संख्या आहे. त्यापैकी मागच्या दशकभरात जवळपास ३८ ग्रंथालय ही बंद पडली तर ७२०  ग्रंथालय सध्या सुरू आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश ग्रंथालयांत अवश्यक सोयी-सुविधा वाचकांना आजही दिल्या जात नाहीत. काही ठिकाणी बैठक व्यवस्था नाही तर काही ठिकाणी पुरेसे पुस्तक उपलब्ध नाहीत अशी अवस्था आहे. विशेष म्हणजे या सार्वजनिक ग्रंथालयांना शासनाकडून भरघोस अनुदान दिले जाते. त्या अनुदानात आता ६० टक्क्यांनी वाढ करण्यात आली मात्र, असे असतानाही शहरातील काही मोजक्याच ग्रंथालयाकडून वाचकांना चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात असल्याचे दिसून येते.जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयालाच गळती-जिल्ह्यातील सर्व ग्रंथालयावर नियंत्रण असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचीच दयनीय अवस्था झाली आहे. या ग्रंथालयात दिवसभरात ३०० विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी येतात. मात्र अनेक ठिकाणी या इमारतीला गळती लागली, पीयूपी छत कोसळले असून, काही ठिकाणी काचा फुटल्या आहेत. तर बाहेरुन भिंतीवर झाडे उगवली आहेत.

इमारत दुरुस्तीचे काम महापालिकेचे-जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ज्या इमारतीत आहे, ती इमारत महापालिके अंतर्गत येते. या इमारतीचा वार्षिक कर आम्ही महापालिकेला नियमित भरत असतो. आम्हाला इमारत देखभाल खर्चासाठी शासनाकडून अनुदान येत नाही. त्यामुळे महापालिकेकडून याची दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. तर अनुदानात वाढ झाल्याने इतर ग्रंथालयाच्या सोयी- सुविधेत आता सुधारणा होत आहेत.-अ. वा. सूर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, नांदेड

टॅग्स :Nandedनांदेडliteratureसाहित्य