ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सुट्यांचे करा नियोजन, प्रवासाठी नांदेड-काकिनाडा विशेष रेल्वे मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 15:45 IST2025-12-11T15:40:53+5:302025-12-11T15:45:02+5:30
या विशेष गाडीमुळे सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

ख्रिसमस, नवीन वर्षाच्या सुट्यांचे करा नियोजन, प्रवासाठी नांदेड-काकिनाडा विशेष रेल्वे मंजूर
नांदेड : ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनेनांदेड आणि काकिनाडा टाउन दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ही विशेष गाडी निझामाबाद, चेरलापल्ली, गुंटूर आणि विजयवाडा मार्गे धावणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष गाडी प्रत्येक दिशेने एक फेरी पूर्ण करेल. गाडी क्रमांक ०७१४२ (नांदेड–काकिनाडा टाउन) ही गाडी २९ डिसेंबर रोजी नांदेडहून दुपारी ३:३० वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक ०७१४३ (काकिनाडा टाउन-नांदेड) परतीच्या दिशेने मंगळवार, ३० डिसेंबर रोजी काकिनाडा टाउनहून सायंकाळी ६ वाजता सुटेल. या विशेष गाडीमुळे सुट्ट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.