शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पीककर्ज वाटपात बँकांचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 00:50 IST

पेरणीसाठी लागणारे खते-बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणाकडून उसनवारी करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ परंतु, कर्जमाफीचा न मिटलेला घोळ अन् बँक अधिका-यांच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना पीककर्जाचा योग्य लाभ घेता येत नाही़ आजपर्यंत ६़६४ टक्केच पीककर्ज वाटप केले तर मागील वर्षात खरिपासाठी केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप केले होते़

ठळक मुद्देचार बँकांना उद्दिष्ट ७१़७९ कोटींचे; वाटप शून्य : आजपर्यंत केवळ सहा टक्केच वाटप

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : पेरणीसाठी लागणारे खते-बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कोणाकडून उसनवारी करण्याची वेळ येऊ नये म्हणून शासनाच्या वतीने बँकांच्या माध्यमातून पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते़ परंतु, कर्जमाफीचा न मिटलेला घोळ अन् बँक अधिका-यांच्या उदासीनतेमुळे शेतक-यांना पीककर्जाचा योग्य लाभ घेता येत नाही़ आजपर्यंत ६़६४ टक्केच पीककर्ज वाटप केले तर मागील वर्षात खरिपासाठी केवळ २८ टक्के पीककर्ज वाटप केले होते़दिवसेंदिवस शेतीच्या उत्पन्नात होणारी घट आणि नैसर्गिक आपत्तीने अडचणीत आलेल्या बहुतांश शेतकºयांना पेरणीच्या काळात पैशाची निकड भासते़ परिणामी शेतकºयांना उसनवारी तसेच सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय राहत नाही़ सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड ही शेतकºयांच्या गळ्याचा फास बनत चालली होती़ ही बाब लक्षात घेवून शासनाच्या वतीने पीककर्ज सुरू केले़ खरीप आणि रबीच्या पेरणी काळात बँकाना पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देणे आणि बँकाच्या माध्यमातून मागेल त्या शेतकºयांना पीककर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे जीव वाचले़ परंतु, मागील दोन वर्षांपासून पीककर्जाकडे शेतकरी पाठ फिरवित आहेत़ यास बँकांचे धोरण आणि अधिकाºयांची उदासीनता कारणीभूत आहे़ दलालामार्फत दहा ते वीस हजार रूपये देणाºया शेतकºयांनाच कर्ज मिळत आहे़ तर सरळ मार्गाने बँकेत जाणाºया बहुतांश शेतकºयांच्या पदरी निराशाच पडत आहे़दरम्यान, खरीप पीककर्ज जुलैअखेरपर्यंत वाटप होणे गरजेचे आहे़ मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ३९४ शेतकºयांना केवळ १३९़६७ कोटी रूपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे़ यामध्ये अनेक बँकांनी एकाही शेतकºयांना कर्ज दिले नाही तर बहुतांश बँकांनी बोटावर मोजण्याइतपत शेतकºयांना पीककर्ज दिले आहे़ जिल्ह्यातील जवळपास २९ बँकांना १६८३ कोटी ४७ लाख रूपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना आजपर्यंत केवळ १३९़६७ कोटी रूपयांचे कर्ज वाटप झाले आहे़---१५ बँकांकडून १०० पेक्षा कमी शेतकºयांना कर्जाचे वाटपपीककर्जाचे उद्दिष्ट दिलेल्या २९ पैकी बँक आॅफ बडोदा, ओरीएंन्टल बँक आॅफ कॉमर्स, युनियन बँक आॅफ इंडिया आणि एयु स्मॉल फायनान्स बँक या चार बँकांनी एकाही शेतकºयांना पीककर्ज दिले नाही़ तर शंभरपेक्षा कमी शेतकºयांना कर्ज देणाºया १५ बँका आहेत़ यामध्ये अलाहाबाद बँकेला ८ कोटी ६९ लाखाचे उद्दिष्ट असताना केवळ १५ शेतकºयांना २० लाख रूपयांचे वाटप केले आहे़ आंध्र बँक (उद्दिष्ट १६ कोटी ७६ लाख) ४१ शेतकºयांना ४५ लाख,कॅनरा बँकेने (१६.३३ कोटी) ६० शेतकºयांना ६१ लाखांचे वाटप, कार्पोरेशन बँक (८.७५ कोटी) २० शेतकºयांना २५ लाख, आयडीबीआय बँक (५१.५७ कोटी) ४० शेतकºयांना ४४ लाख, इंडियन ओव्हरसिज बँक (६.३० कोटी) २२ शेतकºयांना ३४ लाख, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक (७.७२ कोटी) १४ शेतकºयांना १९ लाख, पंजाब नॅशनल बँक (२३.७८ कोटी) ३२ शेतकºयांना ५४ लाख, सिंडीकेट बँक (५.६७ कोटी) ३० शेतकºयांना ३८ लाख, इको (२.०६ कोटी) ३३ शेतकºयांना ५४ लाख, विजया बँक (७.७२ कोटी) २२ शेतकºयांना ४६ लाख, कोटक महिंद्रा बँक (८.२९ कोटी) ५० शेतकºयांना ५५ लाख, कर्नाटका बँक (१.०८ कोटी) १० शेतकºयांना १५ लाख, करूर वैश्य बँक (१.३१ कोटी) १२ शेतकºयांना १० लाख, डीसीबी बँक (१.२५ कोटी) ९७ शेतकºयांना २ कोटी ४५ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे.---बँकनिहाय असे झाले पीककर्जाचे वाटपत्याचबरोबर बँक आॅफ इंडियाने (७७.३६ कोटी) १३२ शेतकºयांना १ कोटी ३३ लाख, बँक आॅफ महाराष्टÑ (८६.६१ कोटी) ७०० शेतकºयांना ५ कोटी दोन लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया (३१.९८ कोटी) १६३ शेतकºयांना १ कोटी २४ लाख, देना बँक (१०२.६५ कोटी) १९६ शेतकºयांना २ कोटी ५३ लाख, एसबीआय (६९०.२० कोटी) ४ हजार ११७ शेतकºयांना ३४ कोटी ३० लाख, अ‍ॅक्सिस बँक (२८.८६ कोटी) ११९ शेतकºयांना ८ कोटी ७७ लाख, एचडीएफसी बँक (२३.१४ कोटी) ३९८ शेतकºयांना १० कोटी ९० लाख, आयसीआयसीआय बँक (१३.६० कोटी) २०८ शेतकºयांना २ कोटी ६७ लाख, महाराष्टÑ ग्रामीण बँक (२३७.१६ कोटी) ४ हजार ५०१ शेतकºयांना ३२ कोटी ७२ लाख तर क्रॉप बँक व मध्यवर्ती बँकेच्या वतीने (१५२.८२ कोटी) १४ हजार ३६२ शेतकºयांना ३२ कोटी ५४ लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडbankबँकFarmerशेतकरी