धावत्या बसमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 18:27 IST2019-02-08T18:12:16+5:302019-02-08T18:27:08+5:30
२ वाजेच्या सुमारास बस बिलोली जवळ आली असतांना झाली घटना

धावत्या बसमध्ये हृद्यविकाराच्या झटक्याने प्रवाशाचा मृत्यू
बिलोली (नांदेड ) : तालुक्यातील कारेगाव - बिलोली बसमध्ये एका वृद्ध प्रवाशाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली. रामा मरीबा सोनकांबळे (६० ) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी 'कारेगाव- बिलोली' ( एम.एच.०६ एस.८७०९ ) ही बस बिलोली कडे जात होती. यात तालुक्यातील आरळी आबादी येथिल रामा सोनकांबळे हे कारेगावपासून बसमध्ये होते. २ वाजेच्या सुमारास बस बिलोली जवळ आली असतांना त्यांच्या छातीत अचानक दुखण्यास सुरुवात झाली आणि त्यांना ह्रदविकाराचा झटका आला.यातच त्यांचा मृत्यू झाला. आगारप्रमुख संजय वाळवे यांनी सदरील घटनेची माहीती बिलोली पोलिसांना दिली. पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करुन प्रेत सोनकांबळे कुटुंबाकडे सुपूर्द केले आहे.