शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

'संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण...', पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 22:00 IST

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: 'पालकमंत्रिपदावरुन अजिबात नाराज नाही. बीड माझाच आहे, आता जालन्याची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यात आनंद आहे.'

Pankaja Munde on Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन अनेक दिवस झाले, तरीदेखील भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी अद्याप देशमुख कुटुंबाची भेट का घेतली नाही? असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय. आता या प्रश्नाचे स्वतः पंकजा मुंडे यांनी उत्तर दिले आहे. 'मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण सध्याची परिस्थिती पाहता, त्यांनीच मला न भेटण्याची विनंती केली,' अशी माहिती पंकजा मुंडे यांनी दिली आहे. 

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी मीडियाशी संवाद साधताना संतोष देशमुख प्रकरणासह पालकमंत्रिपदाबाबत महत्वाचे भाष्य केले. त्या म्हणाल्या की, 'मी देशमुख कुटुंबीयांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनीच मला विनंती केली की, परिस्थिती चांगली आहे, तुम्ही येऊ नका. त्यांची परवानगी घेऊन जाईल, असे मी आधीच जाहीर केले आहे.'

'माझ्या जाण्यापेक्षा, माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे. मी तिथे जाऊव संवेदना व्यक्त करणे, हा माझा वैयक्तिक विषय, त्याची जगासमोर प्रगटीकरण करण्याची आवश्यकता नाही. देशमुख कुटुंबीयांनाही माहिती आहे, माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. कोणी कोणाला मारले त्याविषयी काय माझ्या मनात काडीहीची सहानुभूती नसणार. त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह कशासाठी? असेही पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.

बीडचे पालकत्व मिळाले असते तर...पालकमंत्री पदाबाबत पंकजा मुंडे म्हणाल्या, 'मी कुठलीही चॉईस देण्याचे कारण नाही. माझ्या राजकीय आयुष्यात मी एक टर्म मंत्री राहिले, तेव्हा मी बीडची पालकमंत्री होते. आता जे पद दिले, ते मी आनंदाने स्वीकारले. मला पत्रकाराने विचारले की, तुम्हाला बीडचे पालकमंत्रिपद दिले नाही. तेव्हा मी म्हणाले, बीडचे पालकमंत्रिपद दिल असते, तर आनंदच झाला असता. मात्र, आता जालन्याचे पालकत्व मिळाले आहे, त्याचाही आनंद आहे. मी अजिबात नाराज नाही. जालन्यात जल्लोष चालू आहे, लोक माझे स्वागत करत आहेत. जालण्यासाठी चांगले करण्याची संधी मला मिळाली आहे.'

मुंडे बहीण-भावाला बीडचे पालकमंत्रिपद दिले नाही, यामागे षडयंत्र वाटते का? असे विचारला असता पंकजा म्हणाल्या, 'मी असे काही मानत नाही. एकूणच पुढची परिस्थिती पाहता पालकमंत्रिपद अजितदादांनी घ्यावे, असे मी फार पूर्वी म्हणाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा, यापैकी कोणीही नेतृत्व स्वीकारले, तर मी स्वागतच करणार, असे म्हटले होते. रेणुका मातेच्या दारात आहे. मला अजिबात वाटले नाही की, हा जिल्हा की तो जिल्हा. बीड माझाच आहे, बीडसाठी मी काम करणारच आहे. आतापर्यंत जो पक्षाने आदेश दिला, तो मान्य केला. प्रेम करणारे लोक जालन्यातदेखील आहेत. मी अजिबात अजिबात नाही, अशा बातम्या लावणं बंद करा,' असंही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेSantosh Deshmukhसंतोष देशमुखwalmik karadवाल्मीक कराडBeedबीडNandedनांदेड