शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पैनगंगा नदी कोपली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:47 IST

बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी किनवट, माहूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. ुकिनवट शहरातील विविध सखल भागातील सुमारे २०० घरात पैनगंगा नदीचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याशिवाय माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी गावांतील शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले.

ठळक मुद्देकिनवट- माहूर तालुक्यांना पावसाने झोडपले

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट/ माहूर : बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी किनवट, माहूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. ुकिनवट शहरातील विविध सखल भागातील सुमारे २०० घरात पैनगंगा नदीचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. याशिवाय माहूर तालुक्यातील वानोळा, दिगडी, रुई, हडसणी, केरोळी, शेकापूर, नेर, लिंबायत, वडसा, पडसा, टाकळी, वाईबाजार, मदनापूर, हरडफ, सायफळ, गोकुळ, सिंदखेड आदी गावांतील शेत शिवाराचे मोठे नुकसान झाले.पैनगंगा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखण्यात आली होती. पाणी पुलावरुन वाहत असल्याने दोन्ही बाजूचे कठडे तुटले तर पुलाची क्षतीही झाल्याची शक्यता आहे. पैनगंगा नदीचे पाणी किनवट शहरातील नालागड्डा, रामनगर, मोमीनपुरा, गंगानगर, इस्लामपुरा व बेल्लोरी येथील अंदाजे १५० ते २०० घरात पाणी शिरले.दुपारपर्यंत पन्नास कुटुंबातील लोकांना सुरक्षित स्थळी म्हणजे जिल्हा परिषद शाळेत हलविण्यात आले. उर्वरित कुटुंबातील लोकांना हलविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी दिली़ गजानन महाराज मंदिर वसाईबाबा मंदिर पाण्याने वेढले. कृष्ण प्रिय गो शाळेतील सर्व गायी व जनावरांना हलविण्यात आले़ पावसामुळे किनवट गोकुंदा रोडवर उपविभागीय अधिकारी कार्यालय व पेट्रोल पंप रोड पाण्याखाली आले होते़ याही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती़ कोठारी नजीकच्या पेट्रोल पंप व एमआयडीसी रस्त्यावरही पाणीच पाणी होते़ किनवट-माहूर मार्गावरील शहरालगतच्या सीरमेटी नाल्यावरून पुराचे पाणी डाब धरल्याने दुपारपासून वाहतूक ठप्प झाली. दुपारी तीन वाजता पाऊस थांबल्याने पाणी उतरण्याच्या मार्गावर होते़ पैनगंगा नदी पुलावरुन पाणी वाहिल्याने हाही मार्ग पूर्णत: बंद करण्यात आला़ शनिवारपेठ येथेही घरात पाणी घुसून बाधित झाले होते़बोधडी खु भागात झालेल्या पावसाने व चक्रीवादळाने झाडे उन्मळून पडली आहे़ १९८३ पावसापेक्षाही मोठा पूर नाल्याला आल्याचे गावकऱ्यांनी सांगितले़ पूरपरिस्थितीवर तहसीलदार नरेंद्र देशमुख, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व कर्मचारी लक्ष ठेऊन आहेत़ किनवटचे आ़प्रदीप नाईक यांनी अनेक गावांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिनकर दहिफळे हेही होते़

सखल भाग जलमयलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाने अनेक सखल भागात पाणी साचले आहे. गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे शहरातील बाबानगर, आनंदनगर, वसंतनगर यासह हिंगोलीगेट, बाफना चौक, हमालपुरा आदी भागांमध्ये पाणी साचले होते. महापालिकेने आपत्तीनिवारण पथकांची स्थापना केली आहे.शहरात बुधवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली. संततधार सुरू झालेला हा पाऊस गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरूवारी सकाळपासूनच पावसाचा वेग वाढला होता. शहरातील हमालपुरा, शिवनगर, दत्तनगर, हिंगोलीगेट, बाफना चौक आदी भागात पाणी जमा झाले होते. या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात होते. दुसरीकडे मागील काळातील पूरपरिस्थितीचा अनुभव लक्षात घेता पाणी निचरा करण्यासाठी पथकांची निर्मिती आवश्यक होती. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांच्या नेतृत्वाखाली आपत्ती निवारण पथकाची स्थापना करण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांच्याकडे श्रावस्तीनगर, हमालपुरा, शिवनगर, दत्तनगर, शाहूनगर या भागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांना खडकपुरा, शहीदपुरा, जुनामोंढा, किल्लापरिसर या भागातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. शहर अभियंता माधव बाशेट्टी हे कालापूल, नावघाट, सिद्धनाथपुरी व बिलाल नगर तर कार्यकारी अभियंता कलीम परवेज यांच्याकडे साईबाबा मंदिर नाला परिसराची जबाबदारी देण्यात आली आहे.---जिल्ह्यात ४० टक्के जलसाठाजिल्ह्यात आजघडीला ४० टक्के जलसाठा उपलब्ध झाला असून विष्णूपुरी प्रकल्प जवळपास ८५ टक्के भरला आहे. दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार प्रकल्पातील जलसाठा मात्र चिंताजनक आहे. या प्रकल्पात केवळ ११.२७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील ९ मध्यम प्रकल्पात ३४.३७ टक्के पाणीसाठा असून ४० दलघमी साठा आहे. उच्च पातळी बंधाºयाची परिस्थिती चांगली असून जवळपास ८५ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. यातील आमदुरा बंधारा १०० टक्के भरला आहे. लघु प्रकल्पातही ६७ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला असून ही टक्केवारी जवळपास ४० टक्के इतकी आहे. जिल्ह्यात सरासरी ४० टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून २७८ दलघमी पाणी उपलब्ध आहे. नांदेडसाठी उपयुक्त असलेल्या इसापूर प्रकल्पातील जलसाठ्यातही वाढ होत असून आजघडीला ३३ टक्के हा प्रकल्प भरला आहे. इसापूरमध्ये ३१२.५२ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे.---अधिकारी, कर्मचाºयांना सतर्कतेचे आदेशत्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेवून जिवीत व वित्त हानी टाळण्यासाठी नांदेड महापालिकेने अधिकारी, कर्मचाºयांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी आपत्तीच्या काळात ०२४६२-२३४४६१ व ०२४६२-२३०७२१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.---विष्णूपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडला, देवापूर बंधाराही भरलालोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे प्रकल्पात ९४ घनमीटर प्रति सेंकदाने पाण्याचा येवा सुरू असून प्रकल्पात ८५ टक्के जलसाठा झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा गुरुवारी रात्री ९ वाजता उघडण्यात आला आहे. या दरवाज्यातून ४७१ क्युमेक्स वेगाने पाणी गोदापात्रात सोडले जात आहे.विष्णूपुरीसह मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील देवापूर उच्च पातळी बंधाराही १०० टक्के भरला असून या बंधाºयाचे दरवाजेही उघडण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात १५ आॅगस्ट पासून पावसाची संततधार सुरूच आहे. गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत संततधार पाऊस सुरूच होता. विष्णूपुरी प्रकल्प क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे प्रकल्पात ६८.७९ दलघमी जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्याचवेळी प्रकल्पात पाण्याचा येवा सुरूच आहे. त्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने संबंधितांना सावधानतेचा इशारा दिला होता. रात्री ९ वाजता प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. पाण्याचा येवा सुरूच असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.हवामान खात्यानेही पुढील दोन दिवसात जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नांदेड शहरातील नदीकाठच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास पूर उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाहीे.विष्णूपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला असून गोदावरी काठावरील काठांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊसfloodपूरHomeघरriverनदी