पीक विम्याच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 17:09 IST2017-07-29T17:02:10+5:302017-07-29T17:09:18+5:30
भोकर तालुक्यातील किनी येथे पीक विमा भरण्यासाठी एसबीआय शाखेत रांगेत उभे असलेल्या रामा लक्ष्मण पोतरे ( ४०) रा.दिवशी (बु) या शेतक-याचा मृत्यू झाला.

पीक विम्याच्या रांगेत शेतकऱ्याचा मृत्यू
ऑनलाईन लोकमत / राजेश वाघमारे
नांदेड, दि. २९ : भोकर तालुक्यातील किनी येथे पीक विमा भरण्यासाठी एसबीआय शाखेत रांगेत उभे असलेल्या रामा लक्ष्मण पोतरे ( ४०) रा.दिवशी (बु) या शेतक-याचा मृत्यू झाला. पोतरे दुपारी रांगेत चक्कर येवून कोसळले होते.
त्यानंतर त्यांना किनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उचारासाठी त्यांना भोकरच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले होते. याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोतरे यांना २ एकर शेती होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परीवार आहे.