हैदराबाद विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरुणकुमार जैन यांनी शुक्रवारी सकाळी स्वच्छ भारत अभियानअंतर्गत उमरी रेल्वेस्थानक व परिसराची पाहणी केली. येथून धावणाºया रिकाम्या एक्स्प्रेस रेल्वेला प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी थांबा देण्याबाबत त्यां ...
पावसाची हजेरी कमी अन् ढगाळ वातावरण जास्त, अशा स्थितीत पांढरे सोने (कापूस) पीक अडचणीत सापडले़ रस शोषण करणाºया किडीत कापूस गुरफटल्याने शेतकºयांची मोठी धावपळ उडाली आहे़ किडीचा प्रतिबंध करण्यासाठी फवारणीने शिवारात एकच धांदल उडाली आहे, असे चित्र तालुक्यात ...
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच्या बैठकीला १६ पैकी १४ तालुक्यांतील बीडीओंनी दांडी मारल्यामुळे समाजकल्याण सभापती शीला निखाते यांनी नाराजी दर्शवित गैरहजर असलेल्या बीडीओंचा खुलासा मागविण्यात यावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्या़ ...
राज्य परिवहन महामंडळाने खाजगी वाहतुकीसोबत स्पर्धा करण्यासाठी एसटीमध्ये प्रवाशांना मोफत वायफाय देण्याचा निर्णय घेतला होता़ त्याअंतर्गत नांदेड विभागातील जवळपास ५२० बसेसमध्ये ही सुविधा देण्यात येणार होती़ त्यामध्ये नांदेड आगारातील ८० बसेसमध्ये ही सुविधा ...
प्रकल्प भरल्यानंतर आतापर्यंत चार वेळेस विष्णूपुरी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून आता जायकवाडीच्या वरच्या पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना पुन्हा सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे़ ...
रेल्वेस्थानकावर महिलेच्या वेषातील एका सोनसाखळी चोरट्याला रेल्वे पोलिसांनी गुरुवारी पकडले़ फलाटावर गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून हा चोरटा पळून जात होता़ ...
अशिया खंडातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प असलेल्या विष्णूपुरी प्रकल्पावर बांधण्यात आलेल्या उजव्या कालव्यातून शेतकºयांना पाणी सोडण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. यासाठीची विद्युत यंत्रणा आणि तसेच त्याच्या दुरुस्तीसाठीचे नियोजन करण्यात आले असून या ...
महापालिका निवडणुकीसाठी १९ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर आतापर्यंत ६७ आक्षेप आले आहेत़ या सर्व आक्षेपांच्या निकालानंतर ७ सप्टेंबर रोजी मतदार यादी अंतिम केली जाणार आहे़ ...
शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था काहीसी सुधारत असली तरी वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांचा वाहतूक नियमांकडे होत असलेला कानाडोळा यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. मागील तीन वर्षांत जिल्ह्यात विविध रस् ...