शिवसेनेच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार असून या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना चारा वाटप करण्यात येणार आहे़ ...
जिल्ह्यातील शहापूर (ता.अर्धापूर) शिवारातील सुदर्शन पवार यांच्या विहिरीत माल काढणाऱ्या क्रेनच्या टोपल्यात मजूर बसून जात होते. विहिरीच्या काठावर टोपले आदळून हुक तुटला यात चार जण गंभीर झाल्याची घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. ...
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाअंतर्गत नांदेड जिल्ह्यात १६, १७ आणि १८ जानेवारी असे तीन दिवसीय ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे आयोजन चांदोजी पावडे मंगल कार्यालय, कॅनॉल रोड नांदेड येथे करण्यात आल्याची माहिती प्राचार्या जयश्री आठवले यांनी पत्रपरिषदेत ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत हागणदारी मुक्तीची विशेष मोहीम राबविण्यात येत असून शहरातील हागणदारीमुक्त ठिकाणांना भेटी देण्यासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापनाही केली आहे़ ...
शहरातील बाजारपेठेतून दुचाकी आणि पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणा-या चोरट्यांच्या टोळीला इतवारा पोलिसांनी पकडले आहे़ अटक केलेल्या तिघांकडून चोरीच्या तीन दुचाकी व पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. ...
बिहारच्या मेहसा येथील मनोरुग्ण महिलेला उपचारासाठी घेवून जात असताना रेल्वेस्थानकावर गर्दीमुळे पतीसोबत ताटातूट झाल्यानंतर पनवेल एक्स्प्रेसने ही महिला नऊ महिन्यांपूर्वी नांदेडला आली होती़ ...
शहरातील फुटपाथवर विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटल्यामुळे पादचारी मुख्य रस्त्याचा वापर करीत आहेत़ त्याचबरोबर या दुकानासमोरच वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने शहर वाहतूक शाखेने अतिक्रमणाच्या विरोधात मोहीम सुरु केली आहे़ ...