प्रेमसंबंधाला विरोध, मुलीच्या भावाकडून होणाऱ्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या

By शिवराज बिचेवार | Updated: July 23, 2022 18:05 IST2022-07-23T18:04:38+5:302022-07-23T18:05:50+5:30

या प्रकरणात बिलोली पोलिसांनी बाप लेकाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे.

Opposition to love relationship, suicide of young man due to beating by girl's brother | प्रेमसंबंधाला विरोध, मुलीच्या भावाकडून होणाऱ्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या

प्रेमसंबंधाला विरोध, मुलीच्या भावाकडून होणाऱ्या मारहाणीमुळे तरुणाची आत्महत्या

नांदेड : प्रेमसंबंधाला विरोध करीत नेहमी होणारी मारहाण आणि त्रास याला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथे घडली. गोविंद पिराजी बांदेवाड (३०) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोविंद पिराजी बांदेवाड (३०) या तरुणाचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. परंतु तरुणीच्या कुटुंबीयांकडून मात्र विरोध होत होता. तरुणीच्या भावाकडूनही गोविंद याला नेहमी धमकी आणि मारहाण करण्यात आली. 
नेहमी होत असलेल्या या त्रासाला कंटाळून गोविंदने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात बिलोली पोलिसांनी बाप लेकाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा तपास मपोउपनि रायपल्ले करीत आहेत.

Web Title: Opposition to love relationship, suicide of young man due to beating by girl's brother