शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

'ओपन-क्लोज'अवैध इमानदारीचे कल्याण-मिलन खुलेआम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 8:31 PM

दररोज होते लाखो रुपयांची उलाढाल

ठळक मुद्देमटकाबुकींनी थाटली खुलेआम दुकानेपोलिसांकडून मात्र कारवाईचे सोपस्कार

- शिवराज बिचेवार

नांदेड : राजकीय वरदहस्त, हप्ता संस्कृती, अनेक ठिकाणी यंत्रणेकडून होणारी मांडवली यामुळे जिल्ह्यात अवैध इमानदारीचे ओपन-क्लोज खुलेआम सुरू आहेत़ मटकाबुकी शिरजोर झाले असून गजबजलेल्या वस्त्यांमध्ये त्यांनी कल्याण-मिलनची दुकाने थाटली आहेत़ 

मटक्यामुळे अनेकांचे खिसे गरम होत असले तरी झटपट श्रीमंत होण्याच्या नादात मटक्याचे व्यसन लागलेले गोरगरीब मात्र आपले सर्वस्व गमावून बसतात़ पूर्वी चिठ्ठ्यांवर आकड्यांचा हा खेळ चालत होता़ परंतु आता मोबाईलच्या जमान्यात बुकी आणि जुगारी दोघेही हायटेक झाले असून मोबाईलवर मेसेजद्वारे हा जुगार खेळला जात आहे़ शहरातील प्रत्येक भागात खुलेआम आकडे घेण्यासाठी दुकाने थाटण्यात आली आहेत़ 

शहरात आजघडीला ५०० हून अधिक मटकाबुकी आहेत़ तर त्यांच्या हाताखाली हजारो बेरोजगार तरूण आकड्यांच्या या खेळात अडकले आहेत़ आता तर महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थीही आकड्यांच्या गोष्टी करत आहेत़ गल्लीबोळात  याच आकड्यांच्या खेळामुळे अनेकवेळा कायदा व सुव्यवस्था बिघडत आहे़ शहरातील गणेशनगर, छत्रपती चौक, कलामंदिर, सराफा, जुना मोंढा, देगलूर नाका, बाफना, शिवाजीनगर, नवी आबादी, भाग्यनगर, महाराणा प्रतापसिंघ चौक, वजिराबाद, पावडेवाडी, तरोडा नाका आदी ठिकाणी खुलेआम मटका सुरू आहे़ या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांना दिवसाकाठी ३०० ते ४०० रुपये मजुरी दिली जाते़ दबाव वाढल्यानंतर पोलिसांकडून थातूरमातूर कारवाई केली जाते़ त्यात पंटरच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात येतात़ मात्र मुख्य सूत्रधार नामानिराळाचा राहतो़ त्यानंतर काही दिवस हे अड्डे बंद राहतात़ परंतु थोड्याच दिवसानंतर पुन्हा नव्या जोमाने मटका बुकी कामाला लागतात़ अशाप्रकारे अवैध इमानदारीचा हा खेळ जिल्ह्यात खुलेआम सुरु आहे़ 

महिलाही उतरल्या आकड्याच्या खेळातजुगार हे पुरुषप्रधान व्यसन आहे़ परंतु मटका या जुगारात आता स्त्रियाही उतरल्या आहेत़ जुन्या नांदेडातील इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून आकडे घेण्यात येत आहेत़ घरबसल्या या महिला मोबाईलवर आकडे घेत आहेत़ त्यांना घरातील इतर सदस्यही मदत करीत आहेत़ दुसरीकडे शाळकरी मुले आणि महाविद्यालयीन तरुणाईला आकड्यांच्या या खेळाची भुरळ पडली आहे़ मोबाईलमध्ये विविध अ‍ॅपद्वारे लकी क्रमांक काढून त्यावर पैसे लावण्यात येत आहेत़ 

श्रावस्तीनगर, लालवाडी, मिल एरियात भरते जत्राशहरातील श्रावस्तीनगर, लालवाडी आणि मिल एरियात रात्रीच्या वेळी जुगाऱ्यांची जत्राच भरते़ कल्याण, मिलन, बॉम्बे यासह इतर मटक्यांचे आकडे येण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत़ त्यामुळे त्यावेळेला आपण लावलेला आकडा आला की नाही हे पाहण्यासाठी जुगारी गर्दी करतात़ सकाळपासून सुरु झालेला हा खेळ रात्री उशिरापर्यंत सुरु असतो़ यामध्ये कमी वेळात अन् परिश्रमाशिवाय पैसे मिळत असल्यामुळे अनेकजण आता या व्यवसायात उतरले आहेत़ विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या शेजारीच अनेक ठिकाणी जुगाऱ्यांची दुकाने थाटली आहेत़ 

चव्हाणांचा इशारापालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यापूर्वीही जिल्ह्यात मटका, वाळू यासह इतर अवैध धंदे चालू देणार नाही असा इशारा दिला होता़ शनिवारी भोकरच्या सभेतही त्यांनी याचा पुनरुच्चार केला़ तसेच त्या हद्दीतील ठाणेदाराला जबाबदार धरण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे़ 

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी