महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात आले. प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. संगीता घुगे यांनी केले.
साहित्यिक प्रा. आंधळे म्हणाले की माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषा मागे पडत आहे. विज्ञान ,तंत्रज्ञान, वैद्यकीय क्षेत्रात मराठी भाषेचा वापर होणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे खऱ्या अर्थाने संवर्धन व्हायचे असेल तर मराठी भाषा ही ज्ञानभाषा झाली पाहिजे. ज्ञानेश्वरी ही साहित्यिकांच्या साहित्याची जन्मभूमी आहे. संत साहित्याने जगण्याची दृष्टी दिली. जातीसमूह व लोकगीतातून मराठी भाषेला पूर्वीच्या काळी मोठे वैभव होते. आज मात्र मराठी भाषेकडे अनेक जण पाठ फिरवत आहेत. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त बोलणे, लिहिणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्र्वाधार देशमुख यांनी तर आभार प्रा. शरद वाघमारे यांनी मानले.