नांदेडमध्ये मध्यरात्रीचा थरार; दोन ठिकाणी गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:29 IST2019-04-09T16:23:52+5:302019-04-09T16:29:08+5:30
दोन्ही घटनेत दुचाकीस्वारांचा कारवर गोळीबार

नांदेडमध्ये मध्यरात्रीचा थरार; दोन ठिकाणी गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
नांदेड : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात एकाचा एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. दोन्ही घटना सोमवारी रात्री ११.३० नंतर घडल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदपूर येथील रहिवासी शेख नजीब अब्दुल गफार हे भोकरहून अहमदपूरकडे कारने प्रवास करत होते. कोठा येथील आयजी ऑफिसजवळ दोन दुचाकीस्वार शेख नजीब यांच्या कार समोर येत त्यांच्यावर गोळीबार केला. यात उजव्या हाताच्या खाली गोळी लागल्याने शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
डॉक्टर कुटुंबावर गोळीबार
डोंगरकडा येथील डॉक्टर सतीश गायकवाड़ हे आपल्या कुटुंबासोबत अहमदपूरहून नांदेडकडे कारने प्रवास करत होते. मुसलमानवाडी येथे त्यांच्या कारसमोर दुचाकी आडवी लावून दोघांनी कारवर गोळीबार केला. यात डॉक्टर गायकवाड यांच्या पाठीत गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामीण पोलीसा ठाण्यात दोन्ही गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. यापूर्वीही शहरात दोन मोठया व्यापाऱ्यांवर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनेमुळे नांदेडकरांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.