नांदेड शहरात टँकर-दुचाकीच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:32 IST2018-03-31T00:32:16+5:302018-03-31T00:32:16+5:30

शहरातील सांगवी भागात रेल्वे विभागीय कार्यालयासमोर टँकर आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली़ घटनेनंतर या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता़

One killed in a tanker and two wheeler in Nanded city | नांदेड शहरात टँकर-दुचाकीच्या धडकेत एक ठार

नांदेड शहरात टँकर-दुचाकीच्या धडकेत एक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील सांगवी भागात रेल्वे विभागीय कार्यालयासमोर टँकर आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली़ घटनेनंतर या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता़
वसमत तालुक्यातील सातेफळ येथील मुंजाजी अंभोरे (वय २७) व किशोर अंभोरे हे दोघे जण सांगवी भागातून आपल्या दुचाकीवर जात होते़ दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या टँकर (एम़एच़४३, ई-४७३५) ने दुचाकीला जोरदार धडक दिली़ यात दुचाकी टँकरच्या समोरील चाकाखाली गेली़ यावेळी दुचाकीवरील मुंजाजी अंभोरे हे जागीच ठार झाले़ तर किशोर अंभोरे हे गंभीर जखमी झाले़ टँकरखाली दुचाकी चक्काचूर झाली़
अपघातानंतर रेल्वेच्या विभागीय कार्यालयासमोर वाहतुकीचा खोळंबा झाला होता़ बघ्यांची मोठी गर्दीही जमली होती़ विमानतळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी किशोर अंभोरे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले़ याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़

Web Title: One killed in a tanker and two wheeler in Nanded city