खळबळजनक! नायगांव पंचायत समिती कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By शिवराज बिचेवार | Updated: February 27, 2023 17:45 IST2023-02-27T17:43:56+5:302023-02-27T17:45:14+5:30
आत्मदहनाचा प्रयत्न करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

खळबळजनक! नायगांव पंचायत समिती कार्यालयात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेड:नांदेड जिल्ह्यातील नायगांव पंचायत समितीच्या बीडीओच्या कक्षात आज एकाने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित कर्मचाऱ्यानी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्याला वेळीच आवरल्याने अनर्थ टळलाय.
राजरत्न डुमने असे आत्मदहन करणाऱ्यांचे नाव असून तो सुजलेगाव इथला रहिवाशी आहे. गावातल्या दलित वस्ती योजने अंतर्गत झालेल्या बोगस कामांची चौकशी करावी या मागणीसाठी त्याने वेळोवेळी विनंत्या केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने आज त्याने आत्मदहनाचा हा प्रयत्न केलाय. त्याच्या आत्मदहनाचा प्रयत्न करतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.