देवदर्शनाहून परताना झाडाखाली जेवणाऱ्या पती-पत्नीला बेदम मारहाण करत लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:05 IST2022-03-10T15:04:13+5:302022-03-10T15:05:01+5:30

मरळक येथे देवदर्शन घेऊन परत येताना दोघांनी बेदम मारहाण केली

On their way back from Devdarshan, they beat and robbed the husband and wife who were eating under the tree | देवदर्शनाहून परताना झाडाखाली जेवणाऱ्या पती-पत्नीला बेदम मारहाण करत लुबाडले

देवदर्शनाहून परताना झाडाखाली जेवणाऱ्या पती-पत्नीला बेदम मारहाण करत लुबाडले

नांदेड : नांदेडहून दुचाकीवर मरळक येथे देवदर्शन घेऊन परत येताना झाडाखाली जेवणासाठी थांबलेल्या पती-पत्नीला दोघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या जवळील दागिने आणि मोबाइल असा एक लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. ही घटना ८ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मरळक रस्त्यावर घडली.

या प्रकरणात लिंबगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला. शहरातील पौर्णिमानगर येथील सहायक प्राध्यापक आनंद अशोक खिल्लारे हे पत्नीसह ८ मार्च रोजी नांदेडहून, मरळक येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन मरळकपासून दीड किमी अंतरावर नांदेड रस्त्यावर रस्त्याच्याकडेला त्यांनी आपली दुचाकी थांबविली. सोबत आणलेली शिदोरी झाडाखाली सोडून दोघेही जण जेवन करीत होते.

त्याचवेळी अज्ञात दोघे जण दुचाकीवरून त्या ठिकाणी आले. त्यांनी खिल्लारे आणि त्यांच्या पत्नीला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच खिल्लारे यांच्या पत्नीच्या अंगावरील २३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि दोन मोबाइल असा एकूण १ लाख रुपयांचा ऐवज हिसकावून घेतला. भेदरलेल्या या दाम्पत्याने लिंबगाव पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणाचा तपास सपोनि चंद्रकांत पवार हे करीत आहेत.
 

Web Title: On their way back from Devdarshan, they beat and robbed the husband and wife who were eating under the tree