महात्मा कबीर समता परिषदेच्यावतीने दरवर्षी महाराष्ट्र भूषण, नांदेड भूषण, जीवनगौरव आदी पुरस्कार दिले जातात. यावर्षीही ते दिले जाणार असून कोरोना सेवा योद्धा या पुरस्कारांचेही वितरण केले जाणार आहे. तत्पूर्वी विद्रोही कविसंमेलन होणार असून या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी गोविंद बामणे हे राहणार आहेत. तर विद्रोही कवी डॉ. सय्यद अकबर लाला यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कविसंमेलनात शहर व परिसरातील सर्व विद्रोही कवींनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. मुकुंदराज पाटील यांच्यासह स्वागताध्यक्ष गंगाधर ढवळे, समितीप्रमुख शंकर गच्चे, डॉ. बलदेवसिंह चौहान, बालाजी कंठेवाड, कुलदीप पाटील, आनंद भालेराव, अनुरत्न वाघमारे आदींनी केले आहे.
रमाई जयंतीनिमित्त ७ फेब्रुवारी रोजी विद्रोही कविसंमेलनाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST