फसलेल्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:47 IST2019-03-25T00:47:01+5:302019-03-25T00:47:18+5:30
नांदेड जिल्ह्यात कोळपे पाटील मल्टीस्टेट के्रडीट को़आॅप़सोसायटीत अनेकांनी गुंतवणूक केली असून आतापर्यंत अनेकांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत़ दिवसेंदिवस तक्रारींचा आकडा वाढतच आहे़

फसलेल्यांची संख्या वाढली
नांदेड :नांदेड जिल्ह्यात कोळपे पाटील मल्टीस्टेट के्रडीट को़आॅप़सोसायटीत अनेकांनी गुंतवणूक केली असून आतापर्यंत अनेकांनी त्याबाबत तक्रारी केल्या आहेत़ दिवसेंदिवस तक्रारींचा आकडा वाढतच आहे़ नागरिकांनी यामध्ये फसवणूक झाली असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे़
जिल्ह्यात कोळपे पाटील मल्टीस्टेट क्रेडीट को़ आॅप. सोसायटीच्या २०१३-१४ मध्ये एकूण १६ शाखा होत्या़ त्यामध्ये गुंतवणूकदारांनी बचत खाते, मुदत ठेवी, आवर्ती ठेवी तसेच इतर ठेवींमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ परंतु, सदर सोसायटीच्या शाखाकडून गुंतवणूकदारांना पैसे परत मिळण्यापूर्वीच या शाखा बंद पडल्या आहेत़
त्यामुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळण्यासाठी वारंवार सोसायटीच्या सदस्यांशी संपर्क साधला़ परंतु, काहीच प्रतिसाद मिळाला नाही़ या अनुषंगाने हदगाव पोलीस ठाण्यामध्ये विनोदकुमार अग्रवाल रा़निवघा यांनी सदर सोसायटीच्या चेअरमन, सीईओ व संचालक मंडळाच्या विरोधात तक्रार दिली आहे़ त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ त्यानंतर या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे़
आतापर्यंत या प्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या मोठी आहे़ येत्या काही दिवसांत हा आकडा आणखी वाढू शकतो़ त्यामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोनि़ एस़ डी़ नरवाडे यांनी केले आहे़