शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
4
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
5
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
6
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
7
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
8
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
9
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
10
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
11
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
12
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
13
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
14
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
15
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
16
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
17
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
18
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
19
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
20
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर

नांदेड शहरात स्वच्छतेबाबत ना जनजागृती, ना प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:48 AM

जनजागृती बंधनकारक असतानाही ठेकेदाराकडून ही जनजागृती आतापर्यंत करण्यात आली नाही.

ठळक मुद्देमहापालिका : कचरा विलगीकरणाची व्यवस्थाही नाही

नांदेड : स्वच्छ शहर, सुंदर शहरचा नारा महापालिकेने दिला असला तरी प्रत्यक्ष शहर किती स्वच्छ आहे? हा प्रश्न पुढे आला आहे. शहरात घनकचऱ्यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती, प्रबोधन करण्याची जबाबदारी स्वच्छता ठेकेदारावर आहे. जनजागृती बंधनकारक असतानाही ठेकेदाराकडून ही जनजागृती आतापर्यंत करण्यात आली नाही.घनकचरा संकलनासाठी महापालिकेने प्राप्त झालेल्या तीन निविदापैकी आर अ‍ॅन्ड बी इन्फ्रा प्रोजेक्टला १६४७ रुपये टन दराने काम दिले आहे. या ठेकेदाराने कचºयाचे संकलन करणे, रहिवासी, निवास, हॉटेल, आठवडी बाजार, गार्डन, कत्तलखाना आदी ठिकाणांहून घनकचरा रिक्षा, आॅटो, टिप्पर, ट्रॅक्टरमार्फत संकलन करणे ही कामे करावयाची आहेत. त्याचवेळी घनकचºयासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृती, प्रबोधन करणेही या ठेकेदाराला बंधनकारक आहे. मात्र वर्ष होत आले तरीही शहर स्वच्छतेबाबत ठेकेदाराने एकही जनजागृती अथवा प्रबोधनपर कार्यक्रम घेतला नाही. विशेष म्हणजे, अशी जनजागृती करणे ठेकेदाराला बंधनकारक असताना त्याकडे स्वच्छता विभागाचे अधिकारी मात्र दुर्लक्षच करीत आहेत.दरमहा स्वच्छतेसाठी सदर कंत्राटदारास सव्वाकोटी रुपयापर्यंतची रक्कम अदा करताना बंधनकारक कामे करुन घेणे आवश्यक असताना त्याकडे स्वच्छता विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्षच केले आहे. एकीकडे कचरा वेगवेगळा न करणा-या सामान्य नागरिकांना घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अन्वये कारवाई करण्याचा इशारा महापालिका देत आहे; पण त्याचवेळी कंत्राटदाराच्या न केलेल्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. ही बाब सामान्यांसाठी मात्र अनाकलनीय आहे. यात नेमके पाणी मुरतेय कुठे? हाही संशोधनाचा विषय आहे.कचरा विलगीकरणासाठी कचरा उचलणाºयांकडे हिरवी आणि निळी बीन आवश्यक आहे. घरोघरी जावून कचरा उचलण्याची जबाबदारी असली तरीही ती पार पाडली जात नाही.शहरात आजघडीला अडीचशेहून अधिक मेट्रीक टन कचरा प्रतिदिन उचलला जात आहे. दोन वर्षांपूर्वी शहरातील १७५ मेट्रीक टच कचरा प्रतिदिन निघत नसताना हा आकडा आता अडीचशे मेट्रीक टनावर पोहोचला आहे. त्यामुळे प्रतिदिन खर्चानेही कोटीचे उड्डाण घेतले आहे.दरम्यान, यासंदर्भात स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उत्तर देणे टाळले.वेतन महापालिकेचे, नियंत्रण मात्र ठेकेदाराचेशहर स्वच्छतेच्या कामाचा ठेका महापालिकेने जरी आर अ‍ॅन्ड बी ला दिला असला तरीही महापालिकाच आर अ‍ॅन्ड बी ला मजूर पुरवत असल्याची परिस्थिती आजघडीला निर्माण झाली आहे. झाडूकाम आणि नाली काढण्यासाठी लागणा-या ३३३ मजुरांचा खर्च महापालिका उचलत आहे.विशेष म्हणजे, हा खर्च महापालिका थेट मजुरांना न देता ठेकेदाराला देत आहे. त्यानंतर ठेकेदार मजुरांना कामाची मजुरी अदा करत आहे. त्यामुळे आजघडीला मजुरांच्या दृष्टीने महापालिकेपेक्षा ठेकेदारच वरचढ आहे. या ३३३ मजुरांचा खर्च मात्र महापालिकाच उचलत आहेत. नियंत्रण ठेकेदाराचे आहे.

टॅग्स :NandedनांदेडSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान