नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेलची 'रेशनिंग'; दुचाकीला ३०० तर चारचाकीला दीड हजार रूपयांची मर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:14 IST2026-03-26T16:14:14+5:302026-03-26T16:14:41+5:30

इंधनाचा कोणताही तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे मागणीत दोन ते अडीच पटीने वाढ झाली आहे.

No Full Tanks in Nanded! ₹300 Limit for Bikes, ₹1500 for Cars as Panic Buying Hits Petrol Pumps | नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेलची 'रेशनिंग'; दुचाकीला ३०० तर चारचाकीला दीड हजार रूपयांची मर्यादा

नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेलची 'रेशनिंग'; दुचाकीला ३०० तर चारचाकीला दीड हजार रूपयांची मर्यादा

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवेमुळे नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठाही नियमित सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधनाचा कोणताही तुटवडा नसताना केवळ अफवांमुळे मागणीत दोन ते अडीच पटीने वाढ झाली आहे. या अतिरिक्त ताणामुळे ज्यांना खरोखर इंधनाची गरज आहे, अशा प्रवाशांची नाहक गैरसोय होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता इंधन विक्रीवर तात्पुरते निर्बंध (रेशनिंग) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

इंधन विक्रीचे नवे नियम:
पंपांवरील गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्व पेट्रोल पंप चालकांना आदेश जारी केले आहेत. त्यानुसार, आता विना गिअरच्या दुचाकींना (स्कूटी) २०० रुपये, गिअर असलेल्या दुचाकींना ३०० रुपये आणि चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त १५०० रुपयांपर्यंतच इंधन दिले जाणार आहे.

कॅनमध्ये इंधन देण्यास बंदी:
अनेकांनी मशागतीची कामे नसतानाही शेतकरी मंडळी कॅनमध्ये इंधन भरून नेण्यासाठी गर्दी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही व्यक्तीला कॅन किंवा सुट्ट्या स्वरूपात पेट्रोल-डिझेलची विक्री करू नये, असे सक्त आदेश पंप चालकांना देण्यात आले आहेत.

प्रशासनाला सहकार्य करा
नागरिकांनी नेहमीप्रमाणेच इंधन खरेदी करावे. अनावश्यक साठा करण्यासाठी गर्दी करू नये. ही विनाकारण निर्माण झालेली पॅनिक स्थिती टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
-राहूल कर्डीले, जिल्हाधिकारी, नांदेड

Web Title : नांदेड़ में पेट्रोल-डीजल की राशनिंग: बाइक के लिए ₹300, कार के लिए ₹1500

Web Summary : नांदेड़ में अफवाहों के कारण पेट्रोल-डीजल की राशनिंग शुरू। दोपहिया वाहनों के लिए ₹300, चौपहिया वाहनों के लिए ₹1500 की सीमा। कैन में बिक्री पर प्रतिबंध। कलेक्टर ने सामान्य खरीददारी का आग्रह किया।

Web Title : Nanded Rationing Petrol-Diesel: ₹300 for Bikes, ₹1500 for Cars

Web Summary : Nanded introduces petrol-diesel rationing due to panic buying fueled by shortage rumors. Two-wheelers get ₹300, four-wheelers ₹1500 limit. Cans sales are banned. Collector urges normal purchases.