शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात नव्याने आलेल्यांनी माझ्या विरोधात पैसे वाटले; शिंदेसेनेच्या आमदारांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 15:55 IST

महायुतीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भाजपात आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात काम केले.

नांदेड : महायुतीत मला प्रचंड त्रास झाला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात नव्याने आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधकांचे पैसे वाटले. मला पाडण्यासाठी या मंडळींनी विरोधकांसोबत बैठका घेतल्या. महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे मला केवळ साडे तीन हजारांचे मताधिक्य मिळाले. प्रत्यक्षात मी ज्याप्रमाणे मतदारसंघात काम केले. ते पाहता माझी लीड ५० हजारांची असायला हवी अशा शब्दात आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यानिमित्त आयोजित बैठकीत आमदार कल्याणकर बोलत होते. 

ते म्हणाले, एवढे काम करूनही मताधिक्य कमी मिळत असेल तर आपल्याला आत्मपरीक्षण करावे लागेल. महायुतीत एकमेकांना सहकार्य करणे अपेक्षित होते. परंतु नव्याने भाजपात आलेल्या मंडळींनी माझ्या विरोधात काम केले. मी जर पडलो असतो तर कोण निवडून आला असता? महायुतीत आपल्यावर मोठा अन्याय झाला आहे. महायुतीचा धर्म आम्हीच पाळायचा का? आता आमचीच माणसे फोडण्याचे काम सुरु आहे. त्यांना फोन केले जात आहेत. पण आम्हीही त्यांची माणसे फोडू शकतो ती ताकद आमच्यात आहे हेही त्यांनी लक्षात ठेवावे असा इशाराही कल्याणकर यांनी दिला. दरम्यान, कल्याणकर यांच्या गौप्यस्फोटाने उपस्थित शिवसेना पदाधिकारी अवाक झाले होते.

जिल्ह्यात इंग्रजाच्या नीतीचा अवलंबजिल्ह्याचे राजकारण आजपर्यंत ज्यांनी केले त्यांनी इंग्रजांची फोडा आणि राज्य करा ही नीती वापरली. जिल्ह्यात आता शिवसेनेचे चार आमदार असल्यामुळे अनेकांच्या पोटात दुखायला लागले आहे. आमच्यात भांडणे लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतु त्यांच्या या नीतीला कुणी बळी पडू नका. आता मी आणि बालाजीराव दोघांनीही मंत्रिपद मागितले होते. बालाजीरावांनी मंत्रिपद मागितले म्हणून मी त्यांचा डूक धरायचा अशा वृत्तीचा मी माणूस नाही. प्रत्येकाला मोठं व्हावं वाटते. परंतु कार्यकर्त्यांनीही चारचौघात उघडपणे आमदारांच्या विरोधात बोलणे टाळावे, असे आवाहन आमदार हेमंत पाटील यांनी केले.

टॅग्स :NandedनांदेडShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAshok Chavanअशोक चव्हाणmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४