शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना रखडली; ८८ पैकी केवळ 4 योजनांमधून प्रत्यक्ष पाणी पुरवठा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2018 6:24 PM

जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत  २०१७-१८ च्या कृती आराखड्यानुसार मंजूर झालेल्या ८८ पैकी ३० योजनांची कामे समितीचा वाद, कंत्राटदाराकडून मिळत नसलेला प्रतिसाद आदी कारणांमुळे रखडली आहेत़

- श्रीनिवास भोसले 

नांदेड : जिल्ह्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत  २०१७-१८ च्या कृती आराखड्यानुसार मंजूर झालेल्या ८८ पैकी ३० योजनांची कामे समितीचा वाद, कंत्राटदाराकडून मिळत नसलेला प्रतिसाद आदी कारणांमुळे रखडली आहेत़ त्यामुळे अनेक गाव, वस्ती, तांड्यांवर योजना मंजूर होवूनदेखील तेथील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार नाही, असे चित्र आहे़ 

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने शासनाकडून गाव, वाडी, वस्त्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अशा विविध योजना राबवित आहे़  सदर योजनांच्या प्रस्तावास शासनस्तरावरून चांगला प्रतिसाद मिळत आहे, परंतु अशुद्ध अन् फ्लोराईडमिश्रिम पाणी, पाण्याचे स्त्रोत नसणे, ग्रामपंचायतीचा वाद, कंत्राटदरांचा कामचुकारपणा, जागेचा वाद यासह काही अधिकार्‍यांच्या उदासीनतेमुळे अनेक योजनांची कामे रखडली आहेत़ तर काही योजना पूर्ण होवूनदेखील प्रत्यक्षात पाणीपुरवठा झालेला नाही़ त्यामुळे सदर योजना ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती झाली आहे़ जिल्ह्यातील ८८ पैकी आजपर्यंत केवळ चार योजनांतून प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू केल्याची नोंद जिल्हा परिषदेत आहे़ यामध्ये भोकर तालुक्यातील बल्लाळ तांडा, बल्लाळ, कंधारमधील गांधीनगर, हरबळ गावांचा समावेश आहे़ 

दरम्यान, शासनाकडून मंजूर असूनही पाणीपुरवठा समितीचा वाद, कंत्राटदारांची दिरंगाई, वीजपुरवठा, पाटबंधारे विभागाची हरकत आदी कारणांमुळे ३० योजना रखडल्या आहेत़ यामध्ये बिलोली तालुक्यातील हुनगुंदा, देगलूर-लिंगनकेरूर, धर्माबाद - बाचेगाव, हदगाव-चोरंबा, तरोडा व विठ्ठलवाडी, कंधार-गगनबीड, पांडवदरा, लालवाडी, देवला तांडा, राऊत खेडा, शिरशी खु़, किनवट तालुक्यातील चिंचोली तांडा,  झेंडीगुडा, बेगमबाई तांडा, लोहा-शेवडी (बाजीराव), जोशी सांगवी, सुगाव, माहूर- अंजनी, मुदखेड-दरेगाव तांडा, मुखेड - बेरली, बोरगाव, लोणाळ, मोटरगा, मेथी, सांगवी बेनक व तांडा, नायगाव- नरशी, नरशी तांडा, पळसगाव, नांदेड- विष्णुपूरी, वाडी पूयड, वानेगाव, वारखेड, भानपूर आदींचा समावेश आहे़  माहूर, उमरी, किनवट, कंधार तालुक्यातील अनेक जुन्या योजना आज बंद आहेत़ पाण्याचे स्त्रोत बंद, थकित वीजबिल, हस्तांतरण आदी कारणाने बंद असल्याने तेथे पाण्याचा प्रश्न गंभीर आहे़ याठिकाणी पर्यायी पाणीपुरवठा योजना राबविणे गरजेचे आहे़ 

प्रगतीपथावरील योजनाअनेक योजनांची विहीर पूर्ण झाली, पंपगृह पूर्ण, नवीन जागेची निश्चिती करून काम सुरू केलेल्या तसेच शेवटच्या टप्प्यात प्रगतीपथावर असणार्‍या योजना पुढीलप्रमाणे - भोकर तालुक्यातील बल्लाळ तांडा, धावरी, बिलोली-सावळी, देगलूर- काथेवाडी, कुतुब शहापूरवाडी, देगलूर- लोणी, मरखेल, धर्माबाद - बामणी, नायगाव ध, पांगरी, हदगाव- लोहा तांडा, शिऊर, हिमायतनगर- भोंदनी तांडा, दाबदरी, वाळकेवाडी, कामारी, टेंभूर्णी, कंधार-बोरी खु, धानोरा कौठा, मुंढे वाडी, शेकापूर, तळ्यांची वाडी, किनवट- रोडा नाईक तांडा, चितळी, धनज, जोमेगाव यासह लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, उमरी तालुक्यातील काही योजनांचा समावेश आहे़

मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांचीही प्रतीक्षाचग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नाही़ शासनाकडून खास ग्रामीण भागासाठी राबविण्यात येणार्‍या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मंजूर योजनांची कामेदेखील या ना त्या कारणाने अडकलेली आहेत़ दुसर्‍या टप्प्यात प्रस्तावित असणार्‍या ३८ पैकी ६ योजना तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे़ तर ११ योजनांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर आहेत़ 

टॅग्स :water transportजलवाहतूकWaterपाणीNandedनांदेड