नांदेडमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखाला लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:14 IST2018-11-22T16:07:01+5:302018-11-22T16:14:23+5:30
रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे सांगून दहा लाखांची लुबाडणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

नांदेडमध्ये रेल्वेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखाला लुबाडले
नांदेड : रेल्वेमध्ये नोकरी लावतो असे सांगून दहा लाखांची लुबाडणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील राजनगर येथील सेवानिवृत्त लाईनमन तानाजी जयवंता जाधव यांच्या मुलास रेल्वे विभागात नोकरी लावतो म्हणून दोघा जणांनी त्यांच्याकडून पैसे उकळले. त्यांना वर्ग-४ च्या नियुक्तीचे बनावट आदेशही दिले. या प्रकरणात जाधव व त्यांच्या मुलांकडून आरोपीनी जवळपास दहा लाख रुपये उकळले.
नोकरी लावल्याचे सांगताना बनावट आॅर्डर तसेच जाधव यांच्या मुलाची वैद्यकीय तपासणीही केली. त्यानंतर कोणतेही आदेश न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे जाधव व त्यांच्या मुलाच्या लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीदेवी पाटील या करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणात रेल्वे पोलिस ठाण्यातही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.