नांदेडमध्ये सप्ताह सोहळ्यात हाणामारी, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 05:02 IST2019-03-08T05:02:03+5:302019-03-08T05:02:12+5:30

बाळुमामा महाराज यांच्या सप्ताह सोहळ्यात दोन गटांत बुधवारी रात्री क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली.

Nanded week's tragedy, one killed and two serious | नांदेडमध्ये सप्ताह सोहळ्यात हाणामारी, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

नांदेडमध्ये सप्ताह सोहळ्यात हाणामारी, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर

नांदेड : बाळुमामा महाराज यांच्या सप्ताह सोहळ्यात दोन गटांत बुधवारी रात्री क्षुल्लक कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. मुखेडपासून ५ किमी अंतरावरील शिरूर दबडे गावात घडलेल्या या प्रकारात एकाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण आहे.
शिरूर दबडे येथे बुधवारी बाळूमामा महाराज यांच्या सप्ताहाचा शेवटचा महाप्रसादाचा दिवस होता. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असताना दोन गटांत क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली. रात्री १० वाजता हनुमान मंदिराच्या प्रांगणात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली़ चाकू व तीक्ष्ण हत्यारांचा वापर करीत आरोपी परमेश्वर दिगांबर परसे, गंगाधर दिगंबर परसे व अन्य आठ ते दहा जणांनी मिळून जबर हल्ला केला़ त्यात किशन लक्ष्मण बुट्टे (२३) यांचा मृत्यू झाला. तर मारुती जनार्दन ठावरे (२५ ), संगम नामदेव कराळे (२६) हे तिघेही गंभीर जखमी झाले.

Web Title: Nanded week's tragedy, one killed and two serious