Nanded: भंडाऱ्यातून दोन हजार भाविकांना विषबाधा; लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 08:08 IST2024-02-07T08:08:16+5:302024-02-07T08:08:42+5:30
Nanded News: लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाचे मेंढ्या गावात आले असताना गावकरी व परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ६ फेब्रुवारी रोजी एकादशीनिमित्त उपवास असल्याने भगरीचा प्रसाद होता. यातून दोन ते अडीच हजार भाविकांना विषबाधा झाली आहे.

Nanded: भंडाऱ्यातून दोन हजार भाविकांना विषबाधा; लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथील घटना
- गोविंद कदम
लोहा - तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाचे मेंढ्या गावात आले असताना गावकरी व परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. ६ फेब्रुवारी रोजी एकादशीनिमित्त उपवास असल्याने भगरीचा प्रसाद होता. यातून दोन ते अडीच हजार भाविकांना विषबाधा झाली आहे.
लोहा शहरातील उपजिल्हा रुग्णालयात, खाजगी रुग्णालय फुल झाले असून नांदेड ,अहमदपूर येथे रुग्णावर उपचार सुरू आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांना एसटी बस, काळी पिवळी, याखाजगी वाहनातून नांदेड अहमदपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच लोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, माळाकोळी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप नीलपत्रेवार, नायब तहसीलदार अशोक मोकले, जिल्हा चिकित्सक निळकंठ भोसीकर, यांनी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या सुमारास शहरातील खाजगी रुग्णालय उघडून रुग्णांवर उपचार सुरू केले.