नांदेडमध्ये जुन्या वादातून ट्रॅक्टर चालक तरूणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 15:54 IST2018-12-21T15:53:44+5:302018-12-21T15:54:21+5:30
या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे.
_201707279.jpg)
नांदेडमध्ये जुन्या वादातून ट्रॅक्टर चालक तरूणाचा खून
नवीन नांदेड : जुन्या वादातून भायेगाव येथील एका ३५ वर्षीय तरूणाचा जबर मारहाण करून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, भायेगाव (ता.जि. नांदेड) येथील दत्ता उर्फ मोगो हनुमंत कोल्हे, राम उर्फ काळबा दत्तराव कोल्हे व बालाजी भीमराव कोल्हे यांनी गुरुवारी (दि.२०) रात्री १०.३० वाजे दरम्यान काकांडी रस्त्यावर भायेगाव येथीलच ट्रॅक्टर चालक संजय गोपीनाथ कोल्हे यास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यानंतर वाद वाढवत नेऊन तिघांनी संजयला लोखंडी टॉमीने जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी संजयला नागरिकांनी उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अशी माहिती ठाणे अंमलदार दिलीप पंडित व मदतनीस पो. कॉ. विशाल वाघमारे यांनी दिली.
दरम्यान, पोउपनि. गजानन पाटील, गुन्हे शोध पथकातील पोउपनि. गोविंद खैरे तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी, पोउपनि. प्रसेनजित जाधव, पो.कॉ. तानाजी चाटे, नामदेव मोरे आदींनी सहायक पो.नि. कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनाखाली तिन्ही आरोपींना अटक केली आहे.