शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
2
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
3
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
4
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
6
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
7
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
8
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
9
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
10
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
11
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
12
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
13
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
14
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
15
लिव्ह-इन पार्टनरची गळा दाबून केली हत्या, मृतदेह कारमध्ये नेऊन ठेवला आणि झोपी गेला; दारूमुळे...
16
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
17
December Born Astro: डिसेंबरकर दिसायला आकर्षक, पण आळशीपणामुळे गमावतात अनेक संधी!
18
रतन टाटांच्या मृत्युपत्रात सातासमुद्रापलीकडील व्हिला; खरेदीसाठी कोण इच्छुक? पैसे कोणाला मिळणार?
19
Crime: लैंगिक अत्याचार, नंतर जबरदस्तीने गर्भपात; काँग्रेसच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल!
20
नगराध्यक्षांसह ८ नगरसेवकांनी 'धनुष्यबाण' हाती घेतलं; शिंदेसेनेचा अजित पवार गटाला दे धक्का
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: माझ्या बहिणीशी का बोलतो? म्हणत गोळी झाडून हत्या, मृत-आरोपी कुख्यात गुन्हेगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 12:37 IST

या घटनेने नांदेडात अवैध हत्यारांचा मुक्त वावर, वाढती गुंडागर्दीची दहशत कायम असून, पोलिस यंत्रणा त्याचा बीमोड करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नांदेड : जुन्या नांदेड भागात गुरुवारी सायंकाळी गोळीबाराचा थरार घडला असून, त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेतील मयत व आरोपी दोघेही कुख्यात गुन्हेगार असून, पूर्वाश्रमीचे मित्र होते. प्रेम प्रकरणातून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले होते. दरम्यान, साथीदारांच्या मदतीने आरोपीचा गेम करायला गेला असता हा प्रकार त्याच्यावरच उलटला असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

सक्षम गौतम ताटे (वय २५, रा. संघर्षनगर, नांदेड), असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.जुनागंज भागातील पैलवान टी हाउसच्या मागील बाजूस मिलिंदनगर येथे २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सक्षम ताटे अन्य मित्रांसह थांबला होता. यावेळी त्याचा वाद हिमेश मामीडवार याच्यासोबत झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. हिमेश व त्याच्यासोबत असलेल्या एकाने जवळील बंदुकीतून सक्षम याच्यावर गोळी झाडली, ती त्याच्या छातीत लागल्यावर जवळच पडलेल्या फरशीने डोक्यावर वार करण्यात आले. या दुहेरी हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन सक्षम जागीच गतप्राण झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. इतवारा विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाची चक्रे गतिमान केली. नाकाबंदी करत अवघ्या तासाभरात हिमेश मामीडवार व गजानन मामीडवार या दोघांना ताब्यात घेतले.

सक्षम ताटे आणि हिमेश मामीडवार हे कधीकाळचे जिवलग मित्र असून, दोघेही गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरुद्ध एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. दीड महिन्यापूर्वीच सक्षम ताटे जामिनावर सुटला होता. माझ्या बहिणीशी का बोलतोस असे म्हणत गुरुवारी हिमेशने सक्षमचा खात्मा केला. या घटनेत आणखी काही आरोपी होते का? याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत तपासाच्या सूचना केल्या. या घटनेने नांदेडात अवैध हत्यारांचा मुक्त वावर, वाढती गुंडागर्दीची दहशत कायम असून, पोलिस यंत्रणा त्याचा बीमोड करण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Criminal shot dead over sister conversation; accused notorious.

Web Summary : In Nanded, a notorious criminal shot dead his former friend, सक्षम ताटे, following a dispute over the victim talking to his sister. The accused, हिमेश मामीडवार, and an accomplice were quickly apprehended. The incident highlights Nanded's ongoing issues with illegal weapons and gang violence.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड