शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

नांदेडमध्ये घरकुलांच्या लोकवाट्याची वसुली सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 12:22 AM

शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे.

ठळक मुद्देबीएसयुपी योजनेत १८ हजार ६७६ घरकुलांचे काम पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरात बीएसयुपी लाभार्थ्यांकडील वाटा वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके स्थापन केली असून जवळपास ३० कोटींचा लोकवाटा बीएसयुपी लाभार्थ्यांकडे थकला आहे. हा वाटा वसुल करण्यासाठी मोठे आव्हान महापालिकेपुढे उभे आहे.आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेपुढे उत्पन्न वाढविण्याचे मोठे आव्हान उभे आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत बंद पडल्याने आता उत्पन्न वाढवायचे कसे याबाबत प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात प्रामुख्याने मालमत्ताकराची वसुली, पाणी कराची वसुली याबाबत नियोजन केले जात आहे. दुसरीकडे शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत थकित असलेल्या लोकवाट्याची रक्कमही वसुल करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. उपायुक्त गीता ठाकरे यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.२०११ मध्ये शहरात बीएसयुपी योजनेअंतर्गत १८ हजार ६७६ घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत बहुतांश लाभार्थ्यांनी आपला हिस्सा भरलाच नाही. १२ हजार लाभार्थ्याकडून वाटा वसुल करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बीएसयुपी लाभधारकाकडील वाटा वसुल करण्यासाठी महापालिकेने वसुली पथक स्थापन केले आहे. सहा वर्षापासून थकलेला हा वाटा वसुल करताना मनपापुढे आडचणी येत असल्या तरी लाभार्थ्याकडून टप्प्याटप्प्याने वसुली केली जाईल असे उपायुक्त ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.शहरातील जयभीमनगरात लोकवाटा वसुलीला प्रारंभ करण्यात आला आहे. शहरातील अन्य भागातही हे विशेष वसुली पथके लवकरच पोहोचतील. त्यातून लोकवाटा वसुल होईल. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांना २८ हजार रुपये लोकवाट्यापोटी भरायचे आहेत. तर मागासवर्ग प्रवर्गातील लाभार्थ्याना २५ हजार रुपये भरायचे आहेत. जवळपास ३० कोटी रुपये या विभागाकडून अपेक्षित आहेत.पाणीपट्टीचे मागणी बिले मालमत्ताधारकांना देणारशहरात असलेल्या नळ जोडणी धारकांकडून मोठी वसुली अपेक्षित आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या दप्तर दिरंगाईमुळे मागील तीन ते चार वर्षापासून पाणी कराची वसुली झालीच नाही. त्याचवेळी नेमकी मागणी किती आहे याबाबतही संभ्रमही निर्माण झाला आहे. मागणी निश्चित झाल्यानंतर नळधारकांना बिले दिली जाणार आहेत. त्यानंतर महापालिका विशेष पाणी कर वसुली मोहीम राबविणार आहे. त्याचवेळी शहरात असलेल्या अनधिकृत नळ जोडणीबाबतही कारवाई अपेक्षित आहे. अवैध नळजोडणी घेणाऱ्यांकडून दंड आकारणी करुन ते नळ कनेक्शन नियमित केले जाणार आहेत.

टॅग्स :NandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाTaxकरWaterपाणी