किनवट (नांदेड): शिस्त आणि कर्तव्याची शपथ घेणाऱ्या पोलीस दलातील एका नवरदेवाने ऐन लग्नाच्या दिवशीच पळ काढल्याची धक्कादायक घटना किनवट तालुक्यात घडली आहे. सोमवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर मनसोक्त नाचणाऱ्या या नवरदेवाने मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास कुणालाही काहीही न सांगता धूम ठोकली. विशेष म्हणजे नवरदेव आणि नवरी हे दोघेही चंद्रपूर पोलीस दलात कार्यरत आहेत.
नागसवाडी येथील रहिवासी असलेला नवरदेव आणि मदनापूर येथील रहिवासी असलेली नवरी यांचा विवाह ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:५४ वाजता मदनापूरच्या महादेव मंदिर मंगल कार्यालयात होणार होता. सोमवारी रात्री हळदीचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. पोलीस असलेल्या नवरदेवाने गाण्यांवर ठेका धरत पाहुण्यांचे मनोरंजन केले. मात्र, लग्नाचे विधी सुरू होण्यापूर्वीच हा नवरदेव बेपत्ता झाला.
पाहुणे आले, जेवण तयार झाले, पण नवरदेवच गायब! मंगळवारी सकाळी लग्नासाठी हजारो पाहुणे जमले होते. जेवणावळी तयार होत्या, नवरी लग्नासाठी नटून तयार होती. मात्र नवरदेव बेपत्ता असल्याची बातमी पसरताच मंडपात सन्नाटा पसरला. नवरीकडील मंडळी हवालदिल झाली असून आनंदाच्या वातावरणाचे रूपांतर शोकात झाले. अखेर नवरदेवाच्या वडिलांनी किनवट पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची 'मिसिंग' तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला असून बेपत्ता नवरदेवाचा शोध सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, पोलीस दलात असूनही अशा प्रकारे वागल्याने या नवरदेवावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.
Web Summary : A police officer groom in Kinwat, Nanded, vanished on his wedding day after enjoying his Haldi ceremony. Both bride and groom work in the Chandrapur police. The groom's disappearance has caused distress and a missing person report has been filed.
Web Summary : नांदेड के किनवट में एक पुलिस अधिकारी दूल्हा अपनी हल्दी की रस्म का आनंद लेने के बाद अपनी शादी के दिन गायब हो गया। दूल्हा और दुल्हन दोनों चंद्रपुर पुलिस में कार्यरत हैं। दूल्हे के गायब होने से संकट आ गया है और गुमशुदगी की रिपोर्ट दर्ज की गई है।