गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात 

By शिवराज बिचेवार | Updated: September 3, 2022 16:37 IST2022-09-03T16:37:13+5:302022-09-03T16:37:50+5:30

सध्या गणेशोत्सव सुरु असून या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. 

Nanded police arrested one who was carrying a Gavathi pistol | गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात 

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास नांदेड पोलिसांनी घेतले ताब्यात 

नांदेड- गावठी पिस्टल बाळगलेल्या एकाला वजिराबाद पोलिसांच्या डिबी पथकाने पकडले आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री करण्यात आली. आरोपीकडून हे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. सध्या गणेशोत्सव सुरु असून या काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली आहे. 

पोलिस उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख, पोनि.जगदिश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे सपोनि.संजय निलपत्रेवार, गजाना किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, संतोष बेलूरोड, शेख इम्रान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम यांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोवर्धन घाट परिसरात छापा मारण्यात आला. या ठिकाणी हरिष प्रकाश भगत रा.दिलीपसिंघ कॉलनी याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी हे पिस्टल जप्त केले असून या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Nanded police arrested one who was carrying a Gavathi pistol