शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापुरात नदीत तरंगताना आढळला मृतदेह; घातपात की अपघात? पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:15 IST

अर्धापुरात खळबळ! नदीपात्रात आढळला अज्ञात मृतदेह; पिवळा शर्ट अन् काळी पॅन्ट, ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

अर्धापूर (नांदेड): अर्धापूर तालुक्यातील देगाव शिवारात गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका ४० ते ४५ वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पिंपळगाव ते कारखाना रोडवरील नदीपात्रात ही घटना उघडकीस आली असून, हा मृत्यू घातपात आहे की अपघात, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

नेमका प्रकार काय?मिळालेल्या माहितीनुसार, देगाव परिसरातील नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना स्थानिकांना दिसला. घटनेची माहिती मिळताच बारड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रेय मंठाळे, विजय गायकवाड, शिवराज वाडीकर, दत्ता देशमुख आणि पोलीस पाटील रेखा जाधव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची दुर्गंधी सुटलेली असल्याने तो बाहेर काढताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

ओळख पटवण्याचे आवाहनपोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला आहे. अद्याप या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, मयताचे वय ४० ते ४५ वर्षे असून, अंगात पिवळ्या रंगाचा (काळे ठिपके असलेला) शर्ट आणि काळी पॅन्ट आहे. उंची अंदाजे ५ फूट आहे.

पोलीस तपासाचे आव्हानसंबंधित व्यक्ती नदीपात्रात कशी पोहोचली? हा घातपात तर नाही ना? या प्रश्नांचे गूढ कायम आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. जर कोणाकडे या वर्णनाच्या व्यक्तीची माहिती असल्यास त्यांनी बारड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Body found floating in Ardhapur river; murder or accident?

Web Summary : An unidentified man's body was discovered in the Ardhapur river near Deogaon. Police are investigating whether it was an accident or foul play. The deceased was wearing a yellow shirt and black pants. Identification is underway; police urge anyone with information to contact them.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड