कंधार (जि. नांदेड): बिदर–नांदेड राष्ट्रीय महामार्गावर जंगमवाडी पाटीजवळ मंगळवारी दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास झायलो कार आणि दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका दिव्यांग व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजू लक्ष्मण डुबुकवाड (४०, रा. पानभोसी) असे मृताचे नाव असून, या अपघातात अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुलगी पाहण्यासाठी निघाले अन्...राजू डुबुकवाड हे दोन्ही पायांनी दिव्यांग होते. ते आपल्या भाच्यासोबत शिरूर ताजबंद येथे मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात होते. दरम्यान, बिदरकडून नांदेडकडे वेगाने येणाऱ्या झायलो कारने (MH 31 CS 0757) त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर कारचे नियंत्रण सुटले आणि तिने दुसऱ्या एका वाहनालाही धडक देऊन थेट रस्त्याशेजारील खोल दरीत उडी घेतली.
पाच जण गंभीर जखमीया भीषण अपघातात राजू डुबुकवाड यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले विजय संभाजी अमृतवाड (२५, रा. बागलगाव) यांचा उजवा पाय घोट्यापासून तुटला आहे, तर शुभम नारायण तिगोटे (२६) हे देखील गंभीर जखमी आहेत. झायलो कारमधील पंजाब येथील दोन महिला आणि एक पुरुष यांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
Web Summary : A disabled man died in a horrific accident near Nanded while traveling to see a prospective bride. A speeding Xylo car collided with his motorcycle, also injuring five others. The car then crashed into a ditch. Police are investigating.
Web Summary : नांदेड़ के पास एक भीषण दुर्घटना में एक विकलांग व्यक्ति की मौत हो गई, वह विवाह प्रस्ताव देखने जा रहा था। एक तेज रफ्तार जायलो कार ने उसकी मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे पांच अन्य घायल हो गए। इसके बाद कार खाई में गिर गई। पुलिस जांच कर रही है।