मुलीचा होत असलेला छळ पाहून वडिलांची आत्महत्या; मृतदेहाशेजारीच मुलीनं प्राण सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 10:57 IST2021-11-18T10:56:06+5:302021-11-18T10:57:35+5:30

वडिलांची गळफास घेऊन आत्महत्या; मुलीनं त्यांच्याच मृतदेहाशेजारी जीव सोडला

in nanded newly married girl died after her father commits suicide | मुलीचा होत असलेला छळ पाहून वडिलांची आत्महत्या; मृतदेहाशेजारीच मुलीनं प्राण सोडला

मुलीचा होत असलेला छळ पाहून वडिलांची आत्महत्या; मृतदेहाशेजारीच मुलीनं प्राण सोडला

नांदेड: फ्लॅट आणि कार खरेदीसाठी सासरच्या लोकांकडून होत असलेला मुलीचा छळ पाहवत नसल्यानं मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली. नांदेडच्या देगलूरमधील शहापुरात ही घटना घडली. वडिलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्यानं दु:खी झालेल्या मुलीनंही त्यांच्याच शेजारी जीव सोडला.

देगलूर तालुक्यातील सुगाव येथील माधुरी शंकर भोसलेचा विवाह ८ महिन्यांपूर्वी मुखेड तालुक्यातील उंद्री येथे वास्तव्यास असलेल्या संदीप वडजे यांच्याशी झाला. संदीप पुण्यातल्या कंपनीत नोकरी करतो. लग्नानंतर संदीप आणि त्याच्या कुटुंबियांनी गाडी आणि फ्लॅट खरेदीसाठी ५ लाखांची मागणी करत माधुरीचा मानसिक आणि शारिरीक छळ सुरू केला.

सासरी छळ होत असल्याचं माधुरीनं वडील शंकर भोसलेंच्या कानावर घातलं. शंकर यांनी माधुरीच्या लग्नासाठी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज अद्याप फिटलं नसल्यानं ५ लाख कुठून आणायचे असा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्याच चिंतेतून त्यांनी सोमवारी रात्री गळफास घेऊन जीवन संपवलं.

वडिलांनी आपल्यामुळे आत्महत्या केल्याचं दु:ख माहेरी आलेल्या माधुरीला सहन झालं नाही. तिनं वडिलांच्या शेजारीच जीव सोडला. यानंतर शंकर भोसलेंच्या पत्नीनं माधुरीचा पती संदीप वडजेसह सासरकडच्या ५ जणांविरोधात देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: in nanded newly married girl died after her father commits suicide