शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरसह नांदेडमध्येही एमआयएम दोन नंबरवर; 'विरोधी' भूमिका ठरणार निर्णायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:46 IST

Nanded Municipal Election Results 2026: नांदेड महापालिकेत एमआयएमचे जोरदार पुनरागमन; १५ जागांवर विजय

- भारत दाढेल नांदेड : महापालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाने जोरदार पुनरागमन करत आपले राजकीय अस्तित्व पुन्हा सिद्ध केले आहे. भाजपने ४५ जागा मिळवत सत्ता मिळविली असली, तरी विरोधी बाकड्यावर आता १५ जागा मिळविलेला 'एमआयएम' हा प्रमुख पक्ष राहणार आहे. परिणामी महापालिकेतील एमआयएमची भूमिका आगामी काळात महत्वपूर्ण ठरणार आहे.

नांदेड मनपाच्या इतिहासात प्रथमच २०१२ मध्ये एमआयएमचे ११ नगरसेवक निवडून आल्याने महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले होते. नांदेडमार्गे महाराष्ट्रात एंट्री केली. मात्र २०१७ च्या नांदेड महापालिका निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. त्या अपयशानंतर पक्षाची ताकद कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत एमआयएमने संघटनात्मक ताकद आणि प्रचाराच्या जोरावर १४ जागांवर विजय मिळवत दणक्यात पुनरागमन केले आहे. या निवडणुकीत एमआयएमने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले होते. पक्षाला कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाची आघाडी किंवा थेट साथ नव्हती. तरीही मतदारांनी एमआयएमवर विश्वास दाखवत मोठ्या संख्येने उमेदवार निवडून दिले.

या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मुस्लीम मतदार आपल्याकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली. मुस्लीम मतदारांनी एमआयएमला पसंती दिल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार विखुरला गेला, हा काँग्रेससाठी धक्का आहे. काँग्रेसचा हक्काचा मतदार मानला जाणारा मुस्लीम समाज आता हळूहळू काँग्रेसपासून दूर जात असल्याचे या निकालातून स्पष्टपणे समोर आले आहे.

बदलते राजकीय समीकरण११ वरून थेट १५ नगरसेवकांपर्यंत झालेली वाढ ही केवळ आकड्यांची वाढ नसून, ती एमआयएमच्या वाढत्या राजकीय प्रभावाची नांदी मानली जात आहे. आगामी काळात नांदेड महापालिकेच्या राजकारणात भाजप सत्ताधारी असला, तरी विरोधक म्हणून एमआयएमची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरणार आहे.

ओवेसींनी आव्हान दिलेली 'ती' जागा काँग्रेसने जिंकलीओवेसी यांनी माजी महापौर अब्दूल सत्तार यांना त्यांचा मुलगा अब्दूल गफ्फार निवडून येणार नाही असे भर सभेत सांगितले होते. मात्र, ओवेसी यांनी आव्हान दिल्यावरही अब्दूल सत्तार यांच्या मुलाने तब्बल ४४०४ मताधिक्य घेत मोठे यश मिळविले.

ओवेसी यांच्या सभेचा परिणामनिवडणूक प्रचारादरम्यान एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष असुदद्दीन ओवेसी यांनी नांदेड येथे घेतलेली जाहीर सभा निर्णायक ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ओवेसींच्या आक्रमक भाषणामुळे मुस्लीम मतदारांमध्ये उत्साह संचारला आणि त्याचा थेट फायदा एमआयएमच्या उमेदवारांना झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. एमआयएमचे प्रभाग क्रमांक ११ मध्ये ४, प्रभाग १२ मध्ये २, प्रभाग १३ मध्ये ४, प्रभाग १४ मध्ये ३, प्रभाग १५ मध्ये २ असे एकूण १५ उमेदवार विजयी झाले.

अनपेक्षित निकालाने सर्वांनाच बसला झटकानांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाने सर्वांनाच झटका बसला. नांदेडमध्ये कोणाची सत्ता येणार याविषयी राजकीय विश्लेषकांनाही सांगता येत नव्हते. परंतु भाजपला बहुमत मिळणार हे तेवढेच सत्य होते. यामध्ये एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी करणारा पक्ष ठरेल, असे मात्र कोणालाही वाटले नाही. कारण २०१७ च्या निवडणुकीत या पक्षाला मतदारांनी नाकारले होते. त्यामुळे यावेळेस एमआयएमला किती जागा मिळणार? याविषयी तेवढी स्पष्टता नव्हती. परंतु प्रस्थापित पक्षांना मागे टाकत एमआयएमने पुन्हा एकदा बाजी मारली. त्यांचे तब्बल १५ नगरसेवक महापालिकेत जाणार आहेत. ही किमया इतर पक्षांना साधता आली नाही. विशेषतः काँग्रेस पक्ष यामध्ये कमी पडला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MIM Secures Second Position in Nanded, Role Crucial in Corporation

Web Summary : MIM's resurgence in Nanded municipal elections marks a significant political comeback. Despite BJP's majority, MIM's 15 seats position them as key opposition. Their role will be decisive in future corporation decisions, impacting local politics and Congress's Muslim voter base.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन