शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

खासगी ट्रॅव्हल्सना आवर कोण घालणार? मुखेडजवळ दुचाकीला धडक, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:52 IST

खासगी ट्रॅव्हल्सचा सुसाट वेग ठरला जीवघेणा! खंडगाव पाटीजवळ भीषण अपघात; मुखेड तालुक्यातील दोन तरुणांचा बळी

गडगा (जि. नांदेड): मुखेडहून नांदेडकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. नरसी-मुखेड मार्गावरील खंडगाव (बेंद्री) पाटीजवळ २५ मार्च रोजी हा अपघात घडला. या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा बुधवारी मध्यरात्री नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

जागीच मृत्यू आणि उपचारादरम्यान अंत मिळालेल्या माहितीनुसार, विकास नारायण गायकांबळे (वय ३२, रा. उमरदरी, ता. मुखेड) हे दुचाकीवरून नरसीकडून उमरदरीकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांना धडक दिली. या धडकेत विकास यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले ओमप्रकाश नागोराव कोनापुरे (वय ५०, रा. उमरदरी, ता. मुखेड) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने नांदेडला हलवण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

खासगी ट्रॅव्हल्सच्या वेगावर प्रश्नचिन्हमुखेड-नांदेड मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समध्ये प्रवासी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ लागलेली असते. टप्पा प्रवासी थांब्याला परवानगी नसतानाही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरून या ट्रॅव्हल्स सुसाट वेगाने धावतात. या बेजबाबदार वेगामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला असून, आरटीओ अधिकाऱ्यांनी अशा ट्रॅव्हल्सवर कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Unregulated Private Travels Cause Fatal Accident Near Mukhed; Two Dead

Web Summary : Near Mukhed, a speeding private travels bus fatally struck a motorcycle, killing two men. The accident highlights concerns about reckless driving and overcrowding by private travel operators on the Mukhed-Nanded route, prompting calls for stricter RTO action.
टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड