हदगाव : येथील तहसील कार्यालयात सेविका म्हणून कार्यरत असलेल्या कमलबाई गंगाधर क्षीरसागर यांच्या मृत्यूचा उलगडा झाला असून, सुनेनेच प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांना मदत करणारे इतरही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
१० जानेवारी रोजी कार्यालयास सुट्टी असल्याने बाहेरगावी जात असल्याचे सांगून कमलबाई घराबाहेर पडल्या. त्या परत आल्याच नाहीत. १३ जानेवारी रोजी हदगाव पोलिस स्टेशनमध्ये मयताच्या नातवाने कमलबाई हरविल्याची तक्रार दाखल केली आणि त्याच दिवशी संध्याकाळी वाळकी फाटा येथे खदानित त्यांचा मृतदेह आढळला. यामुळे शहरात खळबळ उडाली. पोलिस प्रशासन तत्काळ कामाला लागले. दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले तरी पोलिसांना सुगावा लागत नव्हता. पीएम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना मृत्यूचे कारण गळा दाबून खून केल्याचे कळाल्याने त्यांनी तपास चक्रे वेगात फिरवली आणि चारही आरोपी ताब्यात घेतले.
पोलिस खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. मयताची सून सुनीता नागेश क्षीरसागर (वय ३८) यांचे व परमेश्वर किशन वानखेडे (रा. वटफळी, ता. हिमायत नगर) यांचे अनैतिक संबंध होते. आरोपी फायनान्सची वसुली करीत असे. यातून दोघांची ओळख झाली. त्यांचे सूत जुळले. एक-दोन महिन्यांपूर्वीच या महिलेचा पती नागेश याचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही या दोघांच्या भेटीगाठींना सेविका कमलबाई यांचा विरोध होता. त्यामुळे अनैतिक संबंधाला अडथळा निर्माण करीत असल्याचा राग धरून सून सुनीता यांनी प्रियकर परमेश्वर वानखेडे याच्या मदतीने १० जानेवारी रोजी मध्यरात्री गळा आवळून कमलबाईंचा खून केला व त्यांचे प्रेत पोत्यात भरून ठेवले. दोन दिवसांनंतर प्रेत वाळकी फाटा येथे फेकून दिले. या कामात त्यांना सुनेचा भाऊ व प्रियकराच्या मित्रानेही मदत केल्याचे निष्पन्न झाले.
पोलिस उपनिरीक्षक गणपत सुदाम बर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनीता नागेश क्षीरसागर (रा. गौतमनगर, हदगाव), परमेश्वर किशन वानखेडे (वय ३८, रा. वटफळी, तालुका हिमायतनगर), अक्षय नारायण कदम (रा. निवघा बाजार, ता. हदगाव) व अमोल लोभाजी ईटकरे (रा. गंगापूर, ता. उमरखेड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे. साहाय्यक पोलिस निरीक्षक संकेत दिघे यांनी तपास केला.
Web Summary : In Hadgaon, a daughter-in-law and her lover murdered the mother-in-law, a government employee, due to her disapproval of their affair. The woman, with help from her brother and lover's friend, strangled the victim and disposed of the body. Police arrested all four.
Web Summary : हदगाँव में, एक बहू और उसके प्रेमी ने सास की हत्या कर दी, क्योंकि वह उनके संबंध का विरोध कर रही थी। महिला ने अपने भाई और प्रेमी के दोस्त की मदद से पीड़िता का गला घोंट दिया और शव को ठिकाने लगा दिया। पुलिस ने चारों को गिरफ्तार कर लिया।