नीट परीक्षेत नांदेडचे नाणे खणखणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 12:28 AM2018-06-05T00:28:00+5:302018-06-05T00:28:00+5:30

इयत्ता १२ वी परीक्षेत नांदेड जिल्ह्याच्या निकालात यंदा घसघशीत वाढ झाली़ तोच पॅटर्न सोमवारी जाहीर झालेल्या नीट या प्रवेशपूर्व परीक्षेत कायम राहिला़ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एम़बी़बी़एस़ व बी़डी़एस़ या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेतलेल्या नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा तर राज्यात पहिला आला़ विशेष म्हणजे, नीटचा निकाल यंदा नांदेडकरांसाठी सुखद धक्का देणारा असून तब्बल १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळणार आहे़

Nanded ki khankhate in fair examination | नीट परीक्षेत नांदेडचे नाणे खणखणीत

नीट परीक्षेत नांदेडचे नाणे खणखणीत

Next
ठळक मुद्दे१००० विद्यार्थी जाणार मेडिकलला

विशाल सोनटक्के।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : इयत्ता १२ वी परीक्षेत नांदेड जिल्ह्याच्या निकालात यंदा घसघशीत वाढ झाली़ तोच पॅटर्न सोमवारी जाहीर झालेल्या नीट या प्रवेशपूर्व परीक्षेत कायम राहिला़ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एम़बी़बी़एस़ व बी़डी़एस़ या वैद्यकीय पदवीच्या प्रवेशासाठी घेतलेल्या नीट परीक्षेत नांदेडचा कृष्णा अग्रवाल देशात सातवा तर राज्यात पहिला आला़ विशेष म्हणजे, नीटचा निकाल यंदा नांदेडकरांसाठी सुखद धक्का देणारा असून तब्बल १ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मेडिकलला प्रवेश मिळणार आहे़
३१ मे रोजी इयत्ता १२ वी चा निकाल घोषित झाला़ या निकालात जिल्ह्याची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले़ तब्बल ८९़३४ टक्के विद्यार्थी १२ वीत उत्तीर्ण झाले़ मागील वर्षी हाच निकाल ८८़५४ टक्के तर २०१६ मध्ये ८४़९९ टक्के इतका होता़ १२ वी निकालाची टक्केवारी पाहता यावर्षीच्या निकालात ०़०८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले़ त्यातही विज्ञान शाखेचा ९६़१५ टक्के आणि वाणिज्य शाखेचा ९५़५१ टक्के इतका राहिला़ गुणवत्तावाढीची ही परंपरा नीट परीक्षेच्या निकालातही नांदेडने राखली़ नीटसाठी देशभरातून १३ लाख २६ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती़ यात ७२० पैकी ६८५ गुण मिळवत नांदेडच्या कृष्णा अग्रवालने राज्यात पहिला क्रमांक पटकाविला़ विशेष म्हणजे, लातूरचा टॉपर यावर्षी ६४० गुणांचा असताना नांदेडच्या अग्रवालने ६८५ गुण मिळवित लातूरला मागे सारले़ ६०० पेक्षा अधिक गुण मिळविणारेही २० विद्यार्थी आहेत़ ७२० पैकी ३६० गुण बायोलॉजीचे असतात़ त्यामुळे बायोलॉजीच्या गुणाला नीट परीक्षेत विशेष महत्त्व असते़ यातही अग्रवालने ३६० पैकी ३५० गुण मिळविले़विशेष म्हणजे, नांदेडमधील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी बायोलॉजीत ३०० हून अधिक गुण मिळविले आहेत़ मागील वर्षीच्या नीट परीक्षेचा नांदेडचा निकाल पाहता यंदा तो चांगलाच वधारल्याचे दिसून येते़ महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाच्या अडीच हजार जागा आहेत़ नांदेडमधून ७४५ विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र ठरले होते़ यंदा नांदेडचा निकाल अधिक सरस लागल्याने हजारापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे़
----
यंदा कटआॅफ घसरला
नीट परीक्षेचा यंदाचा निकाल देशभरात घसरला असला तरी नांदेडसाठी तो सुखद धक्का देणारा आहे़ यंदा कटआॅफ घसरला आहे़ खुल्या प्रवर्गासाठी ५० टक्के म्हणजेच ७२० पैकी ११९ मार्क्स असा राहील़ मागच्यावर्षी हा कटआॅफ १३१ एवढा होता़ तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी हा कटआॅफ ४० टक्के म्हणजे ७२० पैकी ९६ मार्क्स असणार आहे़ जो मागीलवर्षी १०७ एवढा होता़ निकालानुसार ७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी कौन्सिलिंग राऊंडसाठी पात्र ठरले आहेत़
- दशरथ पाटील
संचालक, आय़आय़बी़प्रा़लि.
----
६०० हून अधिक गुण घेणारे विद्यार्थी
नीट परीक्षेत नांदेडने गुणवत्तेचा झेंडा फडकविला आहे़ राज्यात अव्वल स्थान पटकावितानाच तब्बल २० विद्यार्थ्यांनी ६०० हून अधिक गुण मिळविले आहेत़ यात कृष्णा अग्रवाल (६८५), तेजस्विनी बनबरे (६६५), प्रशांत वायाळ (६६१), अभिजित कदम (६५५), रोहित गट्टानी (६५०), सत्यम मंटे (६४५), फय्याज बागवान (६३०), मृदुला भालके (६३३), प्रज्वल तमडी (६२७), आर्या देशमुख (६२३), प्रतिकेश सरनाईक (६२०), विजय हंगे (६२०), तुषार भोसले (६१५), प्रतिभा जनागोंडा (६१५), स्वप्निल देलमाडे (६११), श्रेयश चांडक (६०८), अभय पुरी (६०५), ऋषिकेश जोशी (६०५),मयुर बावनकर (६०२), वैष्णवी कुसुमकर (६०१)

Web Title: Nanded ki khankhate in fair examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.