नांदेड-जम्मू तावी-नांदेड विशेष एक्स्प्रेस शुक्रवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 19:11 IST2021-01-27T19:10:31+5:302021-01-27T19:11:55+5:30

ही गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दर शुक्रवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल

Nanded-Jammu Tawi-Nanded Special Express from Friday | नांदेड-जम्मू तावी-नांदेड विशेष एक्स्प्रेस शुक्रवारपासून

नांदेड-जम्मू तावी-नांदेड विशेष एक्स्प्रेस शुक्रवारपासून

नांदेड : दमरेच्या नांदेड विभागातून गाडी संख्या ०२७५१/०२७५२ नांदेड-जम्मू तावी-नांदेड विशेष एक्स्प्रेस सुरू करण्यात आहे. ही गाडी २९ जानेवारीपासून प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे.

गाडी संख्या ०२७५१ हुजूर साहिब नांदेड-जम्मू तावी विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक) गाडी २९ जानेवारीपासून दर शुक्रवारी धावणार आहे. ही गाडी हुजूर साहिब नांदेड येथून दर शुक्रवारी सकाळी ११.०५ वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, न्यू दिल्ली, जालंधरमार्गे जम्मू तावी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ११.०५ ला पोहोचेल.

गाडी संख्या ०२७५२ जम्मू तावी – हजूर साहिब नांदेड विशेष एक्स्प्रेस (साप्ताहिक) ३१ जानेवारीपासून दर रविवारी धावणार आहे. ही गाडी जम्मू तावी येथून दर रविवारी सकाळी ०५.४५ वाजता सुटेल आणि जालंधर, अंबाला, न्यू दिल्ली, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी ३.५० वाजता पोहोचेल. ही गाडी पूर्ण आरक्षित असेल, या गाडीत १९ डब्बे असतील. हे सर्व डब्बे वातानुकूलित आहेत.
 

Web Title: Nanded-Jammu Tawi-Nanded Special Express from Friday