शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

Nanded: अतिवृष्टीने हातचं पिकं गेलं, त्यात कर्जाचे ओझं; आणखी एका शेतकऱ्याने जीवन संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 12:18 IST

'आता पुढे कसं जगायचं?'; अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, युवा शेतकऱ्याचे दुःख; शेतीसह दुधाचा व्यवसायही करत होता, पण निसर्गापुढे झाला हतबल.

- गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): अतिवृष्टीमुळे पिकांची पूर्णपणे नासाडी आणि डोक्यावर असलेल्या कर्जाच्या ओझ्याला कंटाळून अर्धापूर तालुक्यातील येळेगाव (कारखाना) येथील एका २४ वर्षीय युवा शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे अर्धापूर तालुक्यात शोककळा पसरली आहे.

परमेश्वर नारायण कपाटे (वय २४) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती आहे आणि घरात तिघे भाऊ असा परिवार आहे. परमेश्वर हे शेतीसह दुधाचाही व्यवसाय करत होते. शुक्रवारपासून ते घरी दिसत नसल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध केली असता, घराच्या पाठीमागे असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.

परमेश्वर यांच्या पॅन्टच्या खिशात आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी माझ्या घरच्यांच्या कर्जाला कंटाळून, सततच्या पुरामुळे पूर्ण शेती गेली व आम्हाला सवलती नसल्यामुळे खूप विचार करत होतो. माझ्या भावाच्या मुलाचे शिक्षण कसे करू हे माझ्या मनात सतावत होते. तरी मी आत्महत्या करत आहे." या चिठ्ठीतून त्यांनी आपली हतबलता आणि कुटुंबाच्या भविष्याची चिंता व्यक्त केली आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगरनातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, परमेश्वर यांच्यावर खासगी व बँकेचेही कर्ज होते. अतिवृष्टीमुळे शेती पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी आणि कुटुंबाचे पालनपोषण कसे करावे, या विवंचनेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. परमेश्वर यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबाचा आधारच हिरावला गेला असून, या घटनेने प्रशासनाच्या दुर्लक्षावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded Farmer Suicide: Debt and Crop Loss Lead to Despair

Web Summary : Burdened by debt and crop loss from excessive rain, a 24-year-old farmer from Nanded district committed suicide, leaving behind a note citing financial distress and family worries. The incident highlights the plight of farmers facing adversity.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याNandedनांदेडfloodपूर